Naxal 
विदर्भ

चकमकीत ठार नक्षलवाद्यांवर होते १८ लाखांचे बक्षीस 

मिलिंद उमरे

गडचिरोली : धानोरा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील किसनेली जंगल परिसरात पोलिसांच्या सी ६० जवानांनी रविवारी (ता. १८) ठार केलेल्या पाच नक्षलवाद्यांवर एकूण १८ लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक गोयल म्हणाले की, रविवारच्या चकमकीत ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या मृत नक्षलवाद्यांमध्ये समीता उर्फ राजो किरको (वय ३४) ही मूळची गडचिरोली जिल्ह्यातील मुंगनेर (ता. धानोरा) येथील रहिवासी असून ती प्लाटून क्रमांक १५ ची सदस्य होती. यापूर्वी ती प्लाटून क्र. २०, पोटेगाव दलमचीही सदस्य होती. तिच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात २ खून, ९ चकमकी व इतर ३ असे १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सरकारने तिच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

दुसरी मृत महिला नक्षली कुमली चिपळूराम गावडे (वय २३) हीसुद्धा धानोरा तालुक्यातीलच कटेझरी येथल रहिवसी असून ती कोरची दलम सदस्य होती. ती २०१६ पासून दलममध्ये असलेली कुमली काही काळ कुख्यात महिला नक्षली सृजनक्का हिची सुरक्षारक्षक म्हणूनही कार्यरत होती. तिच्यावर २ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सरकारने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

तिसरी मृत महिला नक्षली सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (वय ३२) ही टिपागड दलममध्ये कार्यरत होती. ती मूळची एटापल्ली तालुक्यातील (जि. गडचिरोली) पिपली बुर्गी येथील राहणारी आहे. २००६ पासून ती दलममध्ये कार्यरत आहे. तिच्यावर १ खून, १४ चकमकी व इतर ६ असे एकूण २१ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर सरकारने ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

चौथी मृत महिला नक्षली चंदा उर्फ चंदना उर्फ मासे भालसे/भाकसे (वय २५) ही असून ती छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीप्लाटून क्रमांक 15 ची सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर सरकारने ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

मृत पुरुष नक्षल्याचे नाव टिरा उर्फ नीलेश उर्फ शिवाजी दारसू मडावी (वय ३०) असून तो धानोरा तालुक्यातीलच चिचोडा येथील रहिवासी आहे. तो टिपागड दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर ६ खून, ७ चकमकी व इतर ८ असे २० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सरकारने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

आतापर्यंत एकूण १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश मिळाले असून २०२० या वर्षातील गडचिरोली पोलिस दलाची ही सर्वांत मोठी कामगिरी आहे. पोलिसांनी ठार केलेल्या या सर्व पाच नक्षलवाद्यांवर सरकारने एकूण १८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. घटनास्थळावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे व नक्षल साहित्य जप्त केल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. 

सी-६० कमांडोंचे कौतुक... 

या चकमकीत ५ नक्षलवाद्यांना सी-६० कमांडो पथकाने कंठस्नान घातल्याबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचेही संकेत दिले आहेत. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahanadi Coalfields IPO: Jio नंतर आता सरकारी कंपनीचा IPO करू शकतो मालामाल! GMP किती, एका लॉटसाठी किती पैसे लागणार?

IND vs NZ: पहिल्या कसोटीत कोण IN अन् कोण OUT? शुभमन गिलच्या Playing XI मध्ये बुमराह, पंत, जुरेल कोणाला संधी? कशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Update : राज्यात दुष्काळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर दोन राज्यातील मेंढपाळांमध्ये मोठा तणाव

"ही दोस्ती तुटायची नाय" सुमीत राघवनने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत धरला ठेका, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Earthshot Prize 2026: पृथ्वी वाचवण्यासाठी प्रिन्स विल्यम यांचा खास उपक्रम! काय आहे अर्थशॉट प्राइज?

SCROLL FOR NEXT