Neelam gore 
विदर्भ

"त्या' मृत बालिकेची डी.एन.ए. तपासणी करा : नीलम गोऱ्हे 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा येथे झालेल्या बालिकेच्या हत्येची माहिती घेतली असून मृताची त्वरित डी.एन.ए. तपासणी करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. 

गोऱ्हे म्हणाल्या की, अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. रस्ते वाहतूक, हायवे अथॉरिटी, टोल प्लाझावर देखरेखीसाठी फक्त सीसीटीव्ही पुरेसे नाहीत. कॅमेरे ऑनलाइन व्हिजिलन्सच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. विशेषत: तेलंगणातील हायवेवरील घटना पाहिली तर महिलाविरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी या तंत्रज्ञान आणि यंत्रणेचा उपयोग सर्व टोल प्लाझा व हायवेवर करावा, अशीदेखील सूचना आपण पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. टोल नाक्‍यावर महिला कर्मचारी नेमण्याची व्यवस्था करता येईल का याचीदेखील माहिती घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


निर्भया फंडाचे पैसे खर्च होत नसल्याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. याबाबत महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात यावेत. निर्भया फंड वापरण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात याव्या. हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचा महत्त्वाचा कालावधी तक्रारी नोंदविण्यात होणाऱ्या विलंबातच जातो.

टोल नाक्‍यावर पाहिजे महिला पोलिस 
तो टाळण्यासाठी व ताबडतोब शोधकार्य सुरू व्हावे म्हणून अशा व्यक्ती हरविल्याबाबतच्या तक्रारी एसएमएस, व्हॉट्‌सऍप, ई-मेलद्वारे व तत्क्षणी नोंदविण्याचे आदेश, सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. साक्षीदार सुरक्षा कायदा अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

नागपूर पोलिसांची प्रशंसा 
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. शहरातील कुठल्याही भागात रात्री 9 नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन न मिळाल्यास, त्या महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यास तिला घरपोच सोडून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागपूर पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Result: आयआयटीची पदवी आणि बड्या पगाराची नोकरी लाथडली! शेतकऱ्याचा लेक बनणार 'जिल्हाधिकारी'; पहिल्याच प्रयत्नात गाजवलं मैदान

सर्वात कमी वयात ICC ट्रॉफी जिंकणारे भारतीय; रोहित शर्मा अव्वल

Latest Marathi News Live Update : व्यावसायिकांना गॅस सिलेंडर बंद झाल्याने हॉटेल चालकाने चुलीवर स्वयंपाक करण्यास केली सुरुवात

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

SCROLL FOR NEXT