crime 
विदर्भ

काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग

संतोष ताकपिरे

अमरावती : कौटुंबिक नातेसबंधामध्ये परस्परांवर विश्वास असला तर संसाराची गाडी नीट चालते. परंतु विश्वास, एकमेकांबद्दलची आपुलकी संपली की, विकृती जन्म घेते. मनातील वाईट विचार त्या व्यक्तीला कोणत्या स्तरावर नेऊन ठेवतील, याचा काहीच नेम नसतो. अमरावतीत शहरातील एका महिलेबाबतही नेमकं हेच झालं. पती अन् दोन अपत्यांबाबत कोणताही विचार न करता तिने पुतण्याला हाताशी धरले. पुढे जे झालं ते माणुसकीला नक्कीच काळीमा फासणारंच होतं. असे करण्यामागे तिचा वैयक्तिक स्वार्थ होता. ही बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. किंबहुना चौकशीमध्ये ती महिला आणि तिच्या पुतण्याने तशी कबुलीसुद्धा आपल्या बयाणामध्ये नागपुरीगेट पोलिसांपुढे दिली.

५ जूनच्या रात्रीच्या सुमारास सुकळी रसूलापूर गावात ही घटना घडली. खुनाच्या घटनेतील संशयितांना अटक केल्यावर तसेच त्यांच्या कबुलीजबाबानंतर या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले. असे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी सांगितले. गोवर्धन शेषराव मेश्राम (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आशीष भीमराव मेश्राम (वय २३) हा खूनप्रकरणातील सूत्रधार निघाला. तो मृत गोवर्धनचा पुतण्या आहे.

आशीषचे गोवर्धनच्या घरी काही महिन्यांपासून येणे जाणे वाढले होते. लॉकडाउन सुरू झाले. अन् हाताला काम नसल्यामुळे गोवर्धन अडीच महिन्यांपासून घरीच होता. त्यामुळे गोवर्धनच्या घरी केव्हाही जाणे, आशीषला शक्य नव्हते. भेटीची ओढ, त्यात गोवर्धनचा अडसर, ही बाब आशीषच्या मनात सलत होती. त्याने अखेर काकाचा काटा काढण्याचा प्लॅन रचला.
 
त्याने घेतली मित्रांची मदत
घटनेच्या दिवशी आशीषने काकाला घरातून बाहेर नेऊन आधी दारू पाजली. आशीषनेही दारू ढोसली. परंतु तो शुद्धीवर होता. त्याने काकाचा खून करण्यासाठी मंगेश अशोक घोडेस्वार, रमेश गंगाराम काळे या दोन मित्रांची मदत घेतली. आशिषने दारूच्या नशेत काकाचा खून केला. त्याच्या मित्रांनी कशाचाही विचार न करता या कामासाठी साथ दिल्याने त्यांच्यावरही गजाआड होण्याची वेळ आली.

नागपुरात हत्याकांडांची मालिका; तडीपार गुंडाचा खून 

पोलिसांचे दहा तासांचे प्रयत्न महत्त्वाचे
नागपुरीगेट पोलिसांनी याप्रकरणी आधी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर घटनेचा उलगडा करण्यासाठी सुकळी रसूलापूर हे गाव गाठले. अन् दुसऱ्य दिवशी पहाटे साडेपाच ते सहा वाजेपर्यंत पुतण्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या कबुलीजबाबानंतर पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी तपासाला गती दिली. अन् तीन दिवसांतच मृत व्यक्तीची पत्नी व आशिषच्या मित्रांनाही अटक केली. आता सर्वच जण न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Fifa World Cup 2026 : लोकसंख्या डोंबिवलीपेक्षाही कमी, पण जिद्द हिमालयाएवढी! 'हा' चिमुकला देश वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला नडला

Solapur: अंनिसच्या प्रयत्नांना यश: अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुटका करत महिलेची 'जटा' केली मुक्त!

Sangli Satara Election: विधान परिषद निवडणुकीत मोठी रणनीती! भाजपचे सदस्य अज्ञातस्थळी हलवणार, क्रॉस वोटिंगची धास्ती?,सांगली-सातारा विधान परिषद लढतीत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT