New guardian minister of bacchu kadu akola 
विदर्भ

अपना भिडू, बच्चू कडू अकोल्याचे नवे पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गेली अनेक वर्ष जनतेच्या कामांसाठी थेट सरकार आणि अधिकारी वर्गाला अंगावर घेणारे बच्चू कडू यांची मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात डॅशिंग आमदार अशी ओळख झाली आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी वेगवेगळ्या विषयावर सरकारला धारेवर धरलं होतं. अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या स्टाईलने समज दिली होती. आता त्यांची अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बुधवारी (ता.8) नियुक्ती करण्यात आली आहे.


प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात अभिनव प्रकारचे आंदोलन करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे तीन टर्मपासून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. गोरगरीब, दिव्यांग बांधवांच्या न्याय, हक्कासाठी त्यांनी आतापर्यंत विविध आंदोलन केली आहेत. त्यामध्ये अमरावती येथील गाडगे महाराज समाधी मंदिरासमोर राहूटी आंदोलन हे सर्वांधिक गाजले. तसेच सोफीया प्रकल्पाविरूद्ध त्यांनी पुकारलेला एल्गार असेल, यासह अधिकाऱ्यांच्या दालनात साप सोडणे, जमिनीत अर्ध नग्न गाळून घेणे, गांधीगिरी आंदोलनांचाही त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. 

राज्यमंत्री कडूंची अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागल्याने आता प्रशासनाला आपल्या कामात अनियमितता करून चालणार आहे, तसे झाल्यास त्यांचा सामना थेट त्यांच्याशी असेल. दर्यांपूर येथील दोन नायब तहसीलदारांचे निलंबनाची घटनाही ताजीच आहे. एकंदरीत जिल्ह्यातील विकास कामे, सामान्यांची प्रश्‍न आता तातडीने मार्गी लागू शकतात. 

प्रहार विस्तारणार
प्रहार पक्षाच्या विस्तारासाठीही अनुकूल वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. कारण प्रहार पक्षाची राजकीय पार्श्‍वभूमीची सुरूवात ही नजिकच्या अमरावती जिल्ह्यापासून असल्याने अकोल्यातही आता प्रहार विस्तारू शकणार आहे.

शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न 
अकोल्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारताना आनंद होत आहे. सर्वपक्षिय पदाधिकाऱ्यांच्या सूचना सर्वप्रथम स्वीकारून त्यावर काम करू. शिवाय गोरगरीब, दिव्यांग बांधवांना तसेच शेवटच्या घटकांना जागेवर न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- बच्चू कडू, पालकमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मतदानाचा नवा फॉर्म्युला! प्रभाग रचनेनुसार चार मतदान कसे कराल? व्हिडिओतून समजून घ्या

बीएमसी निवडणुकीत 'या' वॉर्डमध्ये हाई-वोल्टेज लढत! कुख्यात गुंडाच्या दोन बहिणी आमनेसामने; राजकीय रणसंग्राम रंगणार

Smartphones Tips: तुमच्या फोनचा कॅमेरा फोटोशिवाय करतो 'ही' 3 अद्भूत कामे, 99 टक्के लोकांना नाही माहिती

MHADA: म्हाडाचा विकसकांवर चाप! थकीत भाड्याच्या तक्रारींसाठी नवे पोर्टल सुरू होणार; रहिवाशांना दिलासा

CM Devendra Fadnavis: नायगावचे नाव सावित्रीनगर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सावित्रीबाईंचे स्मारक लढण्याची प्रेरणा देणार!

SCROLL FOR NEXT