Newly Married couple quarantined by the police 
विदर्भ

तिथीचा अट्टहास नडला, नवदाम्पत्याला बसला फटका... वाचा काय आहे प्रकार

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने आंबेतलाव गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. संचारबंदी लागू करण्यात आली. तरीही कुठल्याही परिस्थितीत नववधू घरी आणण्याचे वर व त्यांचे कुटुंबीयांनी ठरवले. मध्य प्रदेशात जाऊन विवाह आटोपला. मात्र, परतीच्या वेळी पोलिसांनी त्यांना गावसीमेवर गाठले. सर्वांना क्वारंटाइन करीत गुन्हा दाखल केला. हा प्रकार रविवार, 24 मे रोजी घडला.

कोरोना विषाणूने गोंदिया जिल्ह्यातही आपले पाय घट्ट केले आहेत. रुग्णसंख्या पन्नासच्या घरात येऊन पोहोचल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. बाधित रुग्ण ज्या गावात आढळत आहेत, त्या गावांना कंटेन्मेंट झोन तर आसपासची गावे बफर झोन म्हणून घोषित केली जात आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हेही दाखल केले जात आहेत. असे असताना बहुतांश जणांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले नाही, हेच आजघडीला दिसून येते. असाच काहीसा प्रकार आंबेतलाव येथे घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आंबेतलाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आंबेतलाव येथे प्रतिबंधात्मक उपाययोजनेनुसार, गाव कंटेनटमेंट झोन घोषित करण्यात आले. तरी मुलाचे लग्न नियोजित तारखेला पार पाडण्याचे मुलाचे वडील आणि कुटुंबीयांनी ठरविले. नियोजित तारखेला वर काही जणांना घेऊन रविवारी (ता. 24) पोलिसांची नजर चुकवूत वधू मंडपी पोहोचला.

लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी नवरदेव नववधूला आंबेतलाव येथे घेऊन येताच पोलिसांनी त्या तिघांविरोधात कंटेन्मेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस पाटील किशोर खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नववधू, नवरदेव व वरपित्याला गावातच क्वारंटाइन करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार अरुण ईलमे, तिलगाम तपास करीत आहेत.

 
आनंदावर विरजण


तीस वर्षीय युवकाने स्वतःच्या लग्न सोहळ्याचे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्यासाठी वडील तसेच ज्येष्ठ मंडळींच्या संमतीने लग्नाची तारीख ठरवली. पण, हे स्वप्न कोरोनाने उद्‌ध्वस्त केले. धूमधडाक्‍यात बॅण्डच्या तालावर मित्र, नातलग गावकरी यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार न पाडता वडिलांना सोबत घेऊन लग्न केले. मात्र, नवरदेव वधू आणि वडिलांना गावातील सेंटरवर क्वारंटाइन व्हावे लागले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता

Panchang 25 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

Pune Crime:'तरुणीशी मैत्रीच्या संबंधातून कात्रजजवळ तरुणाचा खून'; प्रेमाच्या नात्यातून मैत्रीचा बेरंग, नेमकं काय घडलं?

Long Weekend ला निघालात? सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; खेड–शिवापूर टोलनाक्यावर काय स्थिती?

SCROLL FOR NEXT