newly married women could not celebrate mangalagauri due to corona  
विदर्भ

मंगळागौरीला जाणाऱ्या माहेरवाशिणींच्या वाटेवर कोरोनाचे काटे..पारंपरिक खेळांना मुकावे लागणार ...

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : श्रावणातील पहिली मंगळागौर म्हणजे नवविवाहितेच्या जीवनातील आनंदक्षण. लग्नानंतर पहिल्यांदा माहेरला परतण्याची मुलींना विलक्षण ओढ असते. नवविवाहित मुलगी माहेरी मंगळागौरीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करते. या आनंदात तिची आई, बहिणी, शेजारणी व मैत्रिणी सहभागी होतात. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.  

लग्नानंतर सासरी आलेल्या मुलींना कोरोनामुळे मंगळागौरीसाठी माहेरी परत जाता आले नाही. मंगळागौरीच्या आनंदाच्या वाटेवर कोरोनारूपी काटे पसरल्याने नवविवाहितांचा हिरमोड झाला आहे.

सासरीच केले मंगळागौरी पूजन

कोरोनाचे  सावट असल्यामुळे श्रावण महिन्यातील पहिल्याच मंगळवारी नवविवाहित महिलांनी सासरीच मंगळागौरी पूजन करून आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काही महिलांची माहेरी येऊन मंगळागौरी साजरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.   

काय आहे मंगळागौरीचे महत्व

सकाळी स्नान केल्यानंतर सोवळे नेसून, लग्नातील अन्नपूर्णाची धातूची मूर्ती पूजेत मांडण्यात येते. शेजारी शिवपिंड, समोर कणकेचे दिवे व आरास सजविण्यात येते. मंगळागौर कहाणी वाचन, सुहासिनींचे भोजन, आरती आटोपल्यानंतर संध्याकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम होतो. नंतर फुगड्या, झिम्मा, भेंड्या, उखाणे रंगत जातात व रात्रभर मंगळागौर जागविल्या जाते. 

सगळे साधेपणाने झाले
खरं म्हणजे कोरोनाच्या काळात लग्न साधेपणाने झाले. मैत्रिणींना बोलविता आले नाही. श्रावणात कोरोना निघून जाईल व मंगळागौर माहेरी साजरी करता येईल, या अपेक्षांवर पाणी फेरले. मात्र, सासूबाई व घरच्यांनी सांभाळून घेतले. एक मात्र झाले, फुगड्या, झिम्मा, उड्या यांसारख्या मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांना मुकावे लागले.
-पायल कोमावार, पुसद.

संपादन -अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT