crime 
विदर्भ

सामान्यांना लुबाडण्याचा नवीन फंडा; वाहनासमोर पडून उकळले जाते पैसे! 

संतोष ताकपिरे

अमरावती ः साध्या-सरळ लोकांकडून जाणून-बुजून पैसे लुबाडण्याचे अनेक किस्से आपण रोजच ऐकत वा वाचत असतो. मात्र, हा किस्सा काही ओरच आहे. तुम्ही वाचाल तर अवाक् व्हाल. एका दुचाकी वाहनाच्या समोर जाणून-बुजून पडून अपघात घडल्याचे भासवून पैसे उकळण्याचा प्रकार अमरावती शहरात घडला. या प्रकारामुळे तेथे राडा झाला. मात्र, कोतवाली व नियंत्रण कक्षाच्या पोलिसांनी धाव घेतल्यामुळे तणाव निवळला. 

अमरावती शहरातील हा प्रसंग. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर शहराच्या मुख्य चौकात वाहन थांबले की पैसे मागण्यासाठी बरेच जण आसपास फिरताना दिसतात. येथील मालडेकडी रोडवर असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मार्गाने एक युवती शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास आईसोबत दुचाकीने घराकडे जात होती.

तेवढ्यात अचानक एक जखमी मुलगा त्यांच्या दुचाकीसमोर येऊन झोपला. हे काय होत आहे ते त्या मायलेकींना समजलेच नाही. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात भटक्या  २५ ते ३० महिला आणि पुरुषांनी दुचाकीस्वार युवतीला घेरले. त्यामुळे युवती व तिची आई घाबरली. ज्या लोकांनी युवती व तिच्या आईला घेरले त्यापैकी काहींनी युवतीकडे थेट पैशांची मागणी सुरू केली. 

त्या ठिकाणी उपस्थित परिसरातील लोकांपैकी कुणाचीही युवतीला घेरणाऱ्या लोकांची समजूत काढण्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे कोणीतरी तातडीने शहर कोतवाली पोलिस ठाणे आणि नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती देण्यात आली. सीआर व्हॅनसह कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर युवती व महिलेला जमावापासून वेगळे करण्यात आले. खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला दूर जाण्यास पोलिसांनी भाग पाडले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

SCROLL FOR NEXT