सुभेदार ले-आउट ः दुर्गानगर शाळेच्या मैदानात विविध कवायती करताना महापालिका शाळेतील विद्यार्थी.
सुभेदार ले-आउट ः दुर्गानगर शाळेच्या मैदानात विविध कवायती करताना महापालिका शाळेतील विद्यार्थी.  
विदर्भ

संतापाने आले अन्‌ कर्नलांनी मनपा विद्यार्थ्यांचे केले भले

राजेश प्रायकर

नागपूर : निवासी परिसरात कचऱ्याची तक्रार घेऊन संतापाने अतिरिक्त आयुक्तांकडे आलेल्या कर्नल विशाल शर्मा यांनी चक्क मदतीचा हात देत मनपा शाळेतील गरीब मुलांना पूर्व सैनिक प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. सैनिकी प्रशिक्षणासाठी लाखो रुपयांचे शुल्क घेतले जात असताना माजी सैनिक कर्नल शर्मा यांनी मनपा शाळेतील गरीब मुलांसाठी मोफत प्रशिक्षणाची तयारी दर्शविली. मनपाने या विद्यार्थ्यांना सैन्य प्रशिक्षणाची संपूर्ण कीट उपलब्ध करून दिली असून, शेकडो विद्यार्थी उत्साह व जोशात प्रशिक्षण घेत आहेत.
महापालिकेच्या सुभेदार ले-आउटमधील दुर्गानगर माध्यमिक शाळेत मनपाच्या विविध शाळांतील विद्यार्थी टी शर्ट, शूज असा संपूर्ण पोषाख घालून दररोज सायंकाळी सैन्य प्रशिक्षण घेताना दिसून येतात. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी शिस्तप्रिय कर्नल विशाल शर्मा यांच्याशी कचऱ्याच्या समस्येवरून झालेली भेट अन्‌ त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर रंगलेल्या चर्चेची परिणती एका चांगल्या उपक्रमात झाल्याचे सांगितले. कर्नल विशाल शर्मा यांनीही या घटनेस दुजोरा दिला. कर्नल शर्मा येथे "डीआरडीओ'मध्ये (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) नियुक्त आहेत. अतिरिक्त आयुक्तांसोबत चर्चेनंतर शहरातील माजी सैनिकांसोबत बैठक झाली. माजी सैनिक संघटना महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राम कोरके यांनीही यात पुढाकार घेतल्याचे कर्नल शर्मा यांनी नमूद केले. महापालिका शाळातील नववी, दहावी, अकरावीच्या एकूण 128 विद्यार्थ्यांची या पूर्व सैनिक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आल्याचे माजी सैनिक राम कोरके यांनी सांगितले. मात्र, काही मुले "अनफिट' असल्याने तसेच दररोजच्या प्रशिक्षणामुळे शारीरिक दुखण्याने काही मुले कमी झाले असले तरी आज 70 मुले प्रशिक्षण घेत असल्याचेही कोरके यांनी स्पष्ट केले. दुपारी चार ते रात्री साडेसातपर्यंत या मुलांना पूर्वसैनिक प्रशिक्षण दिले जाते. इतर माजी सैनिकही या उपक्रमात सहभागी झाले. त्यामुळे दररोज दुर्गानगर शाळेचे मैदान या मुलांच्या आवाजाने निनादत आहे. शारीरिक प्रशिक्षणासोबतच एक तास "थेअरी'चाही वर्ग होत असल्याचे राम कोरके यांनी सांगितले.
मुलांना पोषक नाश्‍ता
दोन ते तीन तासांच्या प्रशिक्षणानंतर मुले थकतात. ही मुले गरीब असल्याने त्यांच्या पोषक आहाराचा प्रश्‍न होता. मात्र, महापालिकेने ही समस्याही दूर केली. प्रशिक्षणानंतर मुलांना पोषक आहार मिळावा, यावरही भर देण्यात आला. त्यांना नाश्‍ता दिला जात असल्याचे कर्नल शर्मा यांनी सांगितले. मुलांना टी-शर्ट, शूज व इतर साहित्यांची किटही देण्यात आली.

कर्नल विशाल शर्मा यांनी शहरातील मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. पूर्व सैनिक प्रशिक्षण देण्यावर चर्चा झाल्यानंतर सर्व शाळांना निरोप देण्यात आला. सर्व शाळांतून 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यातील काही विद्यार्थी "अनफिट' ठरले. प्रशिक्षणासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले. आज मुले उत्साहात भविष्याच्या दिशेने आगेकूच करीत आहेत.
-राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

जवानांच्या निवासी परिसरात कचऱ्याची समस्या होती. "कनक'च्या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त आयुक्त जोशी यांच्याशी संपर्क झाला. मात्र, ज्या शहरात नियुक्ती होते, तेथे जनहिताची कामे तसेच मुला, मुलींसाठी काहीतरी सैन्याकडून केले जाते. त्यामुळे येथील मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा जोशी यांच्याकडे व्यक्त केली अन्‌ उपक्रम पुढे आला.
-कर्नल विशाल शर्मा, डीआरडीओ.

गेल्या चार-पाच वर्षांपासून मुलांना सैन्य प्रशिक्षणासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, कुणी नगरसेवकही प्रतिसाद देत नव्हते. कर्नल शर्मा यांच्या पुढाकाराने मुलांना सैनिक प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. या उपक्रमात मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, दुर्गानगर शाळेचे मुख्याध्यापक गोहकर यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.
-राम कोरके, उपाध्यक्ष, माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT