no one girl got benefit of savitribai phule dattak palak scheme in amravati 
विदर्भ

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेबद्दल धक्कादायक माहिती आली पुढे, वाचून तुम्हालाही येईल संताप

सुधीर भारती

अमरावती : जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब, निराधार, गरजू मुलींना शिक्षणासाठी मदत व्हावी या भावनेतून शिक्षकांनी स्वतःच पैसे जमा करून सुरू केलेल्या योजनेला शिक्षण विभागानेच टाचणी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेमध्ये या योजनेसाठी जमा करण्यात आलेले लाखो रुपये तसेच पडून असले, तरी मागील तीन वर्षांपासून एकाही मुलीला या योजनेचा लाभ देण्यात आला नाही. शालेय शिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू केली. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे मागील तीन वर्षांपासून या योजनेला 'ब्रेक' लागला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. 

अमरावती जिल्ह्यात या योजनेसाठी प्राथमिक शिक्षकांनी स्वतः जवळून आणि लोकसहभागातून पैसे गोळा केले. जमा झालेल्या वर्गणीच्या मुदतठेवीतून येणाऱ्या व्याजातून गरजू विद्यार्थिनींना दरवर्षी रोख रक्कम दिली जाते. मात्र, मागील तीन वर्षांपासून या योजनेचे कार्यान्वयन थांबले असून गरीब गरजू मुलींना लाभ दिला जात नसल्याचा आरोप शिक्षक समितीने केला आहे. 

सावित्रीबाई फुले दत्तक पालन योजनेचे अमरावती जि.प. शिक्षक सहकारी बँकेच्या गाडगेनगर शाखेत १९ मुदती ठेव पावत्या असून त्यामध्ये एकूण २५ लाख ४८ हजार १६५ रुपये आहेत. याच सेव्हिंग खात्याला २४ लाख २३ हजार ६१९ रुपये आहेत. असे एकूण ४९ लाख ७१ हजार ७८४ रुपये आहेत. यातून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरजू, अनाथ मुलींना मदत करण्यात येत होती. पण ही योजना अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गुंडाळली. ही योजना शिक्षक व शिक्षणप्रेमी यांच्या लोकसहभागातून तयार करण्यात आली होती. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कोंबे, गोकुलदास राऊत, राजेश सावरकर आदींनी केली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी दोन पुरुषांना अटक

SCROLL FOR NEXT