file photo
file photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : फडणवीस, खोपडे, राऊतसह सर्वच उमेदवांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास ठाकरेसह बाराही मतदारसंघांतील उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. उमेदवारांकडून दाखविण्यात आलेला खर्च व खर्च पथकाच्या लेख्यांमध्ये तफावत आढळल्याने ही नोटीस बजावण्यात आली. अनुपस्थित असलेल्या पाच उमदेवारांनाही नोटीस बजावली आहे. 
जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक खर्च लेखे तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक गौतम पात्रा, प्रतीक कुमार, सुब्राज्योती चक्रवर्ती आणि शशी भूषण यांनी नुकतीच केली. निवडणूक खर्च लेखे तपासणीच्या दुसऱ्या फेरीमध्ये दक्षिण-पश्‍चिम, दक्षिण आणि पश्‍चिमचे खर्च निरीक्षक प्रतीक कुमार यांनी दक्षिणमधील अनुपस्थित उमेदवारास नोटीस पाठवली आहे. उर्वरित तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या खर्चामध्ये तफावत आढळल्यामुळे त्यांनाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस पाठविली आहे. नागपूर पूर्व, मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी बचत भवन सभागृहात तपासणी केली. यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते. खर्चात तफावत असलेल्या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली. 
उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक गौतम पात्रा यांनी सरपंच भवन येथे खर्चाची तपासणी केली. उमरेड व कामठी येथील प्रत्येकी एका अनुपस्थित उमेदवारास नोटीस बजावली आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळल्यामुळे त्यांनाही संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस पाठविली आहे. 
काटोल, सावनेर आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्च लेखे तपासणीच्या दुसऱ्या फेरीमध्ये संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या तहसील कार्यालयात खर्च निरीक्षक शशी भूषण यांनी तपासणी केली. हिंगणा विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवार अनुपस्थित असल्याने व निवडणूक खर्चात तफावत आढळून आलेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजावल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT