notice to people who do not have photo in voting list in chandurbazar of amravati 
विदर्भ

लवकर भरा नमुना आठ अर्ज, अन्यथा मतदारयादीतून नाव होणार कमी; १८४९ जणांना नोटीस

शरद केदार

चांदूरबाजार ( अमरावती ) : मतदारयादीमध्ये फोटो नसलेल्या व्यक्तींचा वारंवार शोध घेऊनही संबंधित व्यक्ती मिळाली नाही. शेवटी अशा व्यक्तींना नोटीस पाठवून त्यांनी आठ दिवसांत नमुना आठ भरून न दिल्यास त्यांची नावे मतदारयादीमधून वगळण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक नायब तहसीलदार अर्जुन वांदे यांनी माहिती दिली.

तालुक्‍यात 1 लाख 57 हजार 670 मतदारसंख्या आहे. 1849 मतदारांचे यादीमध्ये फोटोच नाही. अशा मतदारांना यादीत फोटो टाकण्यासाठी त्या परिसरातील बीएलओ यांनी त्यांचा वारंवार शोध घेतला. तसेच निवडणूक विभागाने स्थानिक वृत्तपत्रातसुद्धा जाहिरात देऊन अशा मतदारांचा शोध घेतला. मात्र, अशा मतदारांचा शोध न लागल्याने पुन्हा 1 जानेवारी 2021 च्या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत दुबार व अनेकविध मतदारांची वगळणी करण्यासाठी अशा मतदारांना पोस्टाने नोटीस पाठवण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व तहसीलदार धीरज स्थूल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक नायब तहसीलदार अर्जुन वांदे यांनी तालुक्‍यात आतापर्यंत ११०० मतदारांना त्यांच्या पत्त्यावर नोटीस पाठविली असून उर्वरित मतदारांनासुद्धा नोटीस पाठवणे सुरू आहे. अशा मतदारांना नोटीस प्राप्त झाल्यापासून आठ दिवसांच्या आत संबंधित नमुना आठ भरून देण्यात यावा, अन्यथा त्यांची मतदार यादीमधून नावे वगळण्यात येणार आहेत. 

मतदारयादीत फोटो नसलेल्या मतदारांना आम्ही पोस्टाने नोटीस पाठवले आहे. नोटीस मिळाल्यापासून आठ दिवसांच्या आतमध्ये त्यांनी नमुना आठ भरून द्यावा, अन्यथा अशा मतदारांची नावे मतदारयादीमधून वगळण्यात येतील.
-अर्जुन वांदे, निवडणूक नायब तहसीलदार.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT