देगाव (जि. अकोला) : ‘कोरोना’ व्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारावर बंदी केल्यावर देखील व्यापारी वर्गाकडून भरवलेल्या बाजार पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच तू-तू, मैं-मैं झाली होती.
पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
कोरोना व्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन युध्दपातळीवर काम करत असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतला मिळालेल्या आदेशानुसार जनसमुदाय होऊ नये यासाठी येथे भरणारा दर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायत, पोलिस पाटिल, तळाठी तसेच आरोग्य विभागांना पत्र प्राप्त झाले आहे. आठवडी बाजार, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ तसेच इतर कोणत्याही कारणाने नागरिक एकत्र येऊ नये याकरिता सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात यावे. यासंबंधी दवंडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतने ग्रामस्थांना कळविले असताना, गावातील व्यापाऱ्यांना दवंडीने समजले. परंतु, बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना बाजार बंदची सूचना मिळाली नसल्याने त्यांनी आपले दुकाने मांडायला सुरुवात केली असल्याचे सरपंच, पोलिस पाटिल, आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दुकाने हटवा अन्यथा कारवाही करण्यात येईल असल्याचा इशारा दिला. त्यामुळे बाहेरगावच्या व्यापाऱ्यांनी दुकाने ताबडतोब हटविले परंतु, काही व्यापाऱ्यानी आपले दुकाने सुरु ठेवली. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायतने पुन्हा सूचना केली. परंतु, सूचनेला न जुमानल्यामुळे पोलिस पाटील यांनी पोलिसांना बोलवले. पोलिसांनी सुरु असलेल्या दुकानदारांना कडक कारवाईची ताकीद दिली. यावेळी जमदार गावंडे, अंभोरे, मदनकर उपस्थीत होते.
दंडात्मक कारवाई करण्यात येणार
‘कोरोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या आदेशाचे पालन तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी म्हणून वेळोवेळी ग्रामपंचायतने केलेल्या सूचनांचे कोणीही उलंघन करू नये. केल्यास ग्रामपंचायतच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-अंजना झाकर्डे, सरपंच, देगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.