Now business license are easy to get online  
विदर्भ

खुशखबर! आता एका क्लिकवर मिळणार व्यवसाय परवाना; बाजार आणि परवाना विभागात खेटे मारणे वाचणार 

कृष्णा लोखंडे

अमरावती :  उद्योगांकरिता लागणाऱ्या व्यवसाय परवाना न नूतनीकरण परवाना आता ऑनलाइन मिळू लागला आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे व्यावसायिकांना मनपाच्या बाजार व परवाना विभागात खेटे मारावे लागणार नसून बसल्या जागी परवाने मिळवणे सुकर झाले आहे. आतापर्यंत 370 व्यावसायिकांनी ऑनलाइन परवाने घेतले असून महापालिकेस त्या माध्यमातून 17 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे, असे उपायुक्त अमित डेंगरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या क्षेत्रात जवळपास 22 हजार व्यवासायिक आस्थापना आहेत. व्यवसाय व उद्योग करण्यासाठी तसेच नूतनीकरणासाठी परवाना घेणे आवश्‍यक असून बाजार व परवाना विभागाकडून तो दिल्या जातो. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून या विभागाकडे सादर केल्यानंतर वारंवार खेटे मारावे लागतात. अशा तक्रारींचा सुर वाढला होता. 

परवान्यासाठी जाणाऱ्या व्यावसायिकांना संबंधित कर्मचारी सहकार्य करीत नाहीत, वेळेवर उपलब्ध होत नाहीत अशा तक्रारींसह आतबट्ट्याचा व्यवहार केल्याशिवाय दिल्या जात नाही अशा तक्रारी आहेत.

संगणकीकरणाच्या दिशेने पाऊल टाकताना आयुक्त प्रशांत रोडे यांनी बाजार व परवाना विभागावर भर देत परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे आदेश दिले. उपायुक्त अमित डेंगरे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत 329 व्यावसायिकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले व परवाने प्राप्त केले.

परवाने ऑनलाइन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने व्यावसायिकांचा वेळ वाचण्यासोबतच विभागात खेटे मारण्याचा त्रास वाचला आहे. महापालिकेसही कमी मनुष्यबळात महसूल मिळवण्याचा मार्ग मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यात महापालिकेस 17 लाख रुपये महसूल मिळाल्याची माहिती उपायुक्त अमित डेंगरे यांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT