Now petrol needs power at the threshold of 100 Yavatmal news 
विदर्भ

आता पेट्रोललाच हवे ‘पॉवर’; शंभरीच्या उंबरठ्यावर; आठ दिवसांत १.४१ रुपयांची वाढ

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ : पेट्रोल, डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सध्या शहरात पेट्रोलचा दर हा ९६.४९, तर डिझेलचा दर ८५.९२ रुपये इतका झाला आहे. आठ दिवसांत पेट्रोलदरात १.४१ रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामान्याच्या खिशाला दरवाढीचा फटका बसला आहे. सातत्याने दरवाढ होत असल्याने पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती आवाक्‍याबाहेर गेली आहे. त्यात बेरोजगारी वाढली आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने जगणे कठीण झाले आहे. अशाच काळात पेट्रोल-डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे खिशाला चांगलाच जाळ लागायची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधनाचे दरदेखील दिवसेंदिवस गगनाला पोहोचल्याचे सरकार सांगत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही.

महिनाभरापासून दररोज सरासरी वाढ सुरू आहे. रविवारी (ता. १४) पेट्रोलचे दर ९६.४९ रुपये लिटर, तर डिझेल ८५.९२ रुपयांवर पोहोचले आहे. कोरोनानंतर आता कुठे गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पेट्रोल, डिझेल दरवाढीचा शॉक नागरिकांना बसत आहे. इंधनाचे दर वाढल्याने अनेकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. इंधन दरवाढ सुरूच असल्याचे परिणाम इतर क्षेत्रावरही होत आहे. महागाई वाढली आहे.

घरगुती वापराचा गॅसही महागला आहे. सध्या प्रवासी वाहतूक महागली आहे. तसेच माल वाहतुकीचे दरही वाढले आहेत. मात्र, इंधनाचे दर कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. एस टी महामंडळाचे तिकीट दर वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. काही प्रमाणात जीवनावश्‍यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्याचा फटका नागरिकांच्या खिशाला बसत आहे. त्यामुळे दर कमी करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पॉवर पेट्रोल ९९.१८ रुपये लिटर

काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढतच आहे. परिणामी सर्वसामान्याच्या खिशाला चटका बसला आहे. यवतमाळ शहरात रविवार पॉवर पेट्रोल दर ९९ रुपये १८ पैसे होते. त्यामुळे शंभरी गाठण्यासाठी केवळ ८२ पैसे कमी आहेत. इंधन वाढ होत असल्याने काही दिवसात दर शंभर रुपयापर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT