The number of corona victims in Amravati is near to hundred
The number of corona victims in Amravati is near to hundred 
विदर्भ

अमरावतीत कोरोनाग्रस्तांची वाटचाल शतकाकडे

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. सोमवारी (ता. 11) उशिरा रात्री पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 84 झाली.


स्थानिक मसानगंज येथील 53 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता. 8) मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ हैदरपुरा येथील युवकसुद्धा पॉझिटिव्ह आढळला. त्यावेळी कोरोना बाधितांची संख्या 78 वर स्थिरावली होती. मसनगंज येथील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे नमुने घेण्यात आले. तब्बल दोन दिवस विश्रांतीचे गेल्यानंतर 10 मे ला अचलपूर तालुक्‍यात परसापूर येथील 42 वर्षीय मृत व्यक्ती कोरोनाबाधित आढळला. या व्यक्तीवर नागपूर येथे कर्करोगासंबंधी उपचार सुरू होते. सोमवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्रयोगशाळेकडून एकूण सहा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

त्यात स्थानिक गवळीपुरा येथील 70 वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याचे दुपारी अडीचला स्पष्ट झाले होते. त्यानंतर उशिरा रात्री अकरा वाजता पाच अहवाल पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यापैकी 35 वर्षीय महिला खोलापुरीगेट येथील तर उर्वरित तीन महिला व एक पुरुष मसानगंज (पटवा चौक) येथील रहिवासी आहेत. प्रयोगशाळेकडे आणखी 104 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्हा कोविड- रुग्णालयातून आज-उद्या 45 पैकी 20 ते 25 संशयितांना डिस्चार्ज दिला जाईल.
 

उपराजधानीत चौथ्या मृत्यूची नोंद


नागपूर येथील मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती असलेला पांढराबोडी येथील 29 वर्षीय कोरोनाबाधित युवक सोमवारी दगावला. उपराजधानीत कोरोनाच्या विषाणूमुळे झालेला हा चौथा मृत्यू असून यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरात दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान मेयो आणि मेडिकलमधील प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून पुढे आले. यामुळे शहरातील बाधितांची संख्या 298 वर पोचली आहे. उपराजधानीत कोरोनाच्या बाधेमुळे सतरंजीपुरा येथील पहिला मृत्यू झाला होता. यानंतर तब्बल 25 दिवसांनंतर मोमिनपुरा येथील वृद्ध दगावला होता. तर यानंतर रामेश्‍वरी फुटबालचा खेळाडू असलेला 22 वर्षांचा युवक कोरोनामुळे दगावला होता. सोमवारी (ता.11) शहरात चौथ्या मृत्यूची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT