the officers were beaten with sword In Amravati
the officers were beaten with sword In Amravati 
विदर्भ

किती ही हिंमत! तलवारीचा धाक दाखवून या विभागाच्या अधिकाऱ्यांना डांबले खोलीत...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. तरीही चोरट्या मार्गाने याची विक्री होतच असते. अनेकदा पोलिसांच्या कारवाईतून असे प्रकार उघडकीस आले आहेत. नागरिक चढ्या भावाने याची खरेदी करीत असल्याने विक्रेत्यांचे चांगले होते. यामुळे याला अधिकचे खतपाणी मिळत आहे. शहरातील नागपुरीगेट भागातील मुजफ्फरपुरा येथील अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. माहितीच्या आधारे चार अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत पुढील घटनाक्रम घडला... 

प्राप्त माहितीनुसार, नागपुरीगेटहद्दीत मुजफ्फरपुरा परिसरात गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. माहितीच्या आधारे या विभागाचे अधिकारी राजेश यादव व अन्य चार अधिकारी कारवाईसाठी नागपुरीगेटहद्दीतील मफ्फरपुरा परिसरात कारवाई करण्यासाठी गेले. रस्त्यालगत असलेल्या एका घराच्या दारातच गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी टांगलेल्या होत्या. पथक पोहोचताच घरमालकाने कारवाईसाठी विरोध केला.

यामुळे अधिकारी व घरमालक यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यानंतर काही नागरिकांनी चारही अधिकाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून डांबून ठार मारण्याची धमकी दिली. असा आरोप अन्न व औषध विभागाचे निरीक्षक राजेश यादव यांनी नागपुरीगेट ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. नागपुरीगेट पोलिसांनी धाव घेतल्यामुळे घरात डांबून ठेवलेल्या अधिकाऱ्यांची सुटका झाली. सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली असताना शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सामग्री विकली जात आहे. 

फक्त पंचवीस पुड्या जप्त

अन्न औषध विभागाचे निरीक्षक राजेश यादव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख नबी शेख कादरसह भावाविरुद्ध डांबून ठेवणे, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे. ज्या ठिकाणी अन्न औषध विभागाचे पथक कारवाईसाठी गेले होते, तेथे अटक झालेल्या व्यक्तीचे घर आहे. तेथेच तो गुटखा विक्री करीत होता. तेथून फक्त वीस ते पंचवीस गुटखा पुड्याच जप्त झाल्या, असे पोलिसांनी सांगितले.

मोठ्या तस्करांना कशासाठी सूट?

शहरातील नागपुरीगेट परिसरात गुटखा तस्करी करणारे मोठे रॅकेट आहेत. त्यांच्याविरोधात ठोस भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन सुद्धा दाखवत नसल्याचे वास्तव आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या अन्नऔषध विभागाच्या पथकाला जमावाने याबाबत सुनावल्याची माहिती आहे. 

पोलिसांना दिली नाही पूर्वकल्पना 
परिसर संवेदनशील असतानाही अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी जाताना पोलिसांना पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली. 
- अर्जुन ठोसरे, 
पोलिस निरीक्षक, नागपुरीगेट ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: फायर फायटर डे का साजरा केला जातो? जाणून घ्या सोप्या शब्दात महत्त्व

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

SCROLL FOR NEXT