bucket child girl.jpg 
विदर्भ

हृदयद्रावक घटना : चिमुकली खेळताना बाथरुमध्ये गेली अन्...

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : तालुक्यातील पारखेड येथे एका दीड वर्षीय चिमुकलीचा पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज 21 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.

याबाबत प्राप्‍त माहितीनुसार, पारखेड येथील सागर सावळे यांची दिड वर्षीय मुलगी चंचल ही सकाळी खेळतांना बाथरुममध्ये गेली. या ठिकाणी पाण्याने भरलेली मोठी बकेट ठेवलेली होती. चंचल अचानक या बकेटमध्ये पडली. मात्र, बाथरूम घराच्या बाहेर अंगणात असल्याने लवकर ही बाब कुणाच्या निदर्शनास आली नाही. 

डॉक्टरांनी केले मृत घोषित
थोड्या वेळाने सदर प्रकार लक्षात आला असता कुटुंबीयानी तत्काळ तिला येथील सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून चंचलला मृत घोषित केले. या घटनेमुळे सर्वत्र पारखेड येथे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

यापुर्वीही घडल्या अशा घटना
लहानमुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, हे या घटनेवरून प्रकर्षाने दिसून येत आहे. मुलं अंगणात खेळत असताना आई-वडील लक्ष देत नाहीत. त्यामुळेच अशा घटना घडतात. यापुर्वीही अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. तरी पालकांनी लहानमुलांबाबत दक्षता बाळगणे आवश्‍यक बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT