One killed, two seriously injured in road accident at amravati
One killed, two seriously injured in road accident at amravati 
विदर्भ

तो नेहमीप्रमाणे दूध वाटण्यासाठी दुचाकीने निघाला, त्याच्या मागे दुसरे वाहनही होते; मात्र, काळ विरुद्ध दिशेने येत होता

सुरेंद्र चापोरकर

बेलोरा (जि. अमरावती) : आसेगाव ते फुबगाव मार्गवर पिकअप व्हॅनने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दूध व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गांभीर जखमी झाले. गुरवारी (ता. १७) सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालसिंग भादू उईके (वय ३२, रा. डोंगरफाटा, मध्यप्रदेश) हा नेहमीप्रमाणे दूध वाटण्यासाठी आसेगाव ते फुबगाव मार्गवरून दुचाकीने जात होता. शैलेश किंटुकले व अतुल वानखडे (दोघेही रा. फुबगाव) हे एकाच दुचाकीने त्याच मार्गावरून जात होते.

त्यांच्या समोर उईके या दूध व्यावसायिकाची दुचाकी होती. दरम्यान, एमएच २७ बीएफ ३२२४ क्रमांकाचे पिकअप व्हॅन विरुद्ध दिशेने आले. भरधाव वाहनाने आधी दूध व्यावसायिकाला जोरदार धडक दिली. नंतर मागे असलेल्या दुसऱ्या दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात लालसिंग उईके याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दोन दुचाकींना उडविल्यानंतर पिकअप व्हॅन चालकाने वाहन घटनास्थळी सोडून पळ काढला. जवळपास अर्धा तास जखमी घटनास्थळी पडून होते. काही नागिरकांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर पोलिसांना अपघताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच आसेगाव पोलिसांनी पसार व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

SCROLL FOR NEXT