online fraud of rupees 11 lakh with student in pusad of yavatmal 
विदर्भ

एमबीबीएस प्रवेश देण्यावरून विद्यार्थ्याची फसवणूक, साडेअकरा लाखांचा गंडा

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : बनावट संकेतस्थळ तयार करून व खोटा ई-मेल पाठवून पुसद येथील एका विद्यार्थ्याला एमबीबीएस प्रवेशासाठी 11.34 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही घटना कोरोना काळातील आहे. यासंदर्भात कर्नाटकातील एका कथित डॉक्‍टरविरोधात पुसदच्या वसंतनगर पोलिसांत सोमवारी (ता.14) तक्रार दाखल केली असून, आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पुसद येथील वीज महावितरण कंपनीतील ऑपरेटर दिलीप सुधाकर राजे (रा. तिरुपती पार्क, पुसद) यांनी ही तक्रार दाखल केली. आरोपीचे नाव डॉ. शैलेंद्र जोशी (बंगळूर) असे आहे. दिलीप राजे यांचा मुलगा वेदांत हा बारावीला होता. त्याने नीट परीक्षेत 74 टक्‍के गुण मिळविले. दरम्यान, त्याच्या मोबाईलवर डॉ. शैलेंद्र जोशी यांच्याकडून कर्नाटक राज्यातील मंगलोर येथील कस्तुरबा एमबीबीएस महाविद्यालय प्रवेशासंबंधात व्हॉट्‌सअ‌ॅपवर मेसेज व ई-मेल आला. एमबीबीएस प्रवेशासाठी 39 लाख 74 हजार रुपये प्रवेशशुल्क व डोनेशन असल्याची माहिती होती. या माहितीची शहानिशा न करता राजे यांनी संपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर संवाद साधला. तेव्हा डॉ. जोशी यांनी राजे यांना वेदांतच्या मोबाईलवर वेबसाइट पाठविली.

प्रथम वर्ग एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यासाठी कर्नाटकातील दोन बँक व सिंडिकेट बँकेचा खाते क्रमांक दिला. या खात्यांवर राजे यांनी 18 मार्च ते 24 ऑक्‍टोबरपर्यंत वेगवेगळ्या तारखांना सोयीनुसार कधी 50 हजार, तर कधी एक लाख रुपये अशी एकूण 11 लाख 34 हजार जमा केलेत. यासाठी 22 वेळा बँकेचे ट्रांजेक्‍शन झाले. या व्यवहारासाठी आरोपीने हुशारीने आधीचा व्हॉट्‌सऍप बंद करून साध्या मोबाईलवर टेक्‍स मेसेजचा वापर केला. लॉकडाऊनच्या काळात राजे यांना प्रत्यक्ष कर्नाटकातील बंगरूळुला जाता आले नाही, याचाच गैरफायदा आरोपीने घेतला.

अनलॉक झाल्यानंतर राजे कुटुंबीयांनी बंगळुरूला दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली. मात्र, आरोपीची भेट झाली नाही. त्यांनी बंगळुरू येथील कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता, पाठविण्यात आलेली वेबसाइट व आरोपी डॉ. शैलेश जोशी यांचा महाविद्यालयाशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे राजे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर दिलीप राजे यांनी फसवणूक प्रकरणाची तक्रार पुसद येथील वसंतनगर पोलिसांमध्ये केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शशिकांत दोडके तपास करीत आहेत.

एमबीबीएस प्रवेशासंदर्भात झालेल्या फसवणुकीची चौकशी सुरू आहे. आरोपीचे कॉल डिटेल्स, बॅंकांचे ट्रांजेक्‍शन तपासून आरोपीला अटक करण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे. या प्रकरणात आरोपीने दिलेले नाव, वेबसाइट, ई-मेल आयडी या सर्वच गोष्टी बनावट आहेत. आरोपींचे कॉल रेकॉर्ड उपलब्ध असून, आरोपीचा लवकरच शोध घेऊ.
- शशिकांत दोडके, पोलिस उपनिरीक्षक, पुसद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT