only few psychiatric available in amravati 
विदर्भ

मानसिक रुग्णांमध्ये वाढ, पण मानसोपचार तज्ज्ञांची संख्या कमी

सुधीर भारती

अमरावती : आजच्या काळातील सर्वांत मोठी समस्या असलेल्या ताण तणाव, नैराश्‍याच्या गर्तेतून बाहेर पडण्याची साधने मर्यादित आहेत. त्यामुळे व्यक्ती तसेच मानसोपचार क्षेत्रात कार्यरत मंडळींतील दरी अधिक वाढली आहे. प्रत्येक 10 हजार नागरिकांमागे एक मानसपोचारतज्ज्ञ असावे असे सर्वसाधारण प्रमाण असते. मात्र, आजच्या स्थितीत हे प्रमाण कमी झालेले दिसून येत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. 

लॉकडाउनच्या काळात मागील काही महिन्यांपूर्वी संपूर्ण व्यवहार बंद पडल्याने सर्वांनाच घरी बंदिस्त राहावे लागले. अनेकांचे रोजगार गेले, बेरोजगारी वाढली. त्यामुळे मानसिक ताणतणाव अधिक वाढले. अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या पाहता या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांची संख्या अतिशय कमी आहे. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसिक रोग कक्षाची  दररोजची ओपीडीच मूळात 30 ते  40 रुग्णांची आहे. त्या तुलनेने याठिकाणी दोन ते तीनच मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत आहेत. यावरून जिल्ह्याची कल्पनाच न केलेली बरी. एकूणच मानसिक वैफल्याचा सामना करण्यासाठी पुरेशी यंत्रणाच अद्याप विकसित झालेली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.    

गुणात्मकता महत्त्वाची -
संख्येपेक्षा गुणात्मकता अधिक महत्त्वाची आहे. मूळात कोरोनामुळे सध्या निर्माण झालेल्या मानसिक परिस्थितीचा सामना आव्हानात्मक रूपाने करायचा की संकट म्हणून पाहायचे याचा विचार ज्याचा त्याने केला पाहिजे. मानसोपचारतंज्ज्ञांची संख्या तुलनेने कमी आहे, असे आपण मानत नाही. कारण याठिकाणी गुणात्मकता महत्वाची ठरते आणि ती आहे. आपल्यावर ओढवलेला प्रसंग नेहमीच संकट आहे, असे मानून चालणार नाही. त्याचा आव्हानात्मक मुकाबला करायला शिकले पाहिजे.
- पंकज वसाडकर, मानसोपचारतज्ज्ञ.

मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत मंडळींची संख्या कमी आहे, हे मान्य. मात्र, नागरिकांनी सुद्धा आपले कर्तव्य जाणून घेतले पाहिजे. अनेकदा उपलब्ध संसाधनाचा वापर केला जात नाही. आज अमरावतीत या क्षेत्रात अनेक लोक कार्यरत आहेत. मात्र, ज्यांना मानसिक त्रास जाणवतो असे अनेक लोक मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास तयारच नसतात. त्यांची मानसिकता तयारच होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कमी संख्येला दोष देवून चालणार नाही.
- डॉ. अमोल गुल्हाने, मानसोपचारतज्ज्ञ
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT