Order of the Commissioner of Transport to issue driver's license 
विदर्भ

परवाना नूतनीकरणाची कामे होणार, परंतु या अटींचे पालन गरजेचे

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढताच शासनाने अनेक सेवा बंद केल्या. यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वाहन परवान्याचे कामही बंद करण्यात आले होते. आता हे परवाने देण्याच्या कामाला काही अटी लादून परवानगी देण्यात आली आहे.

परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम करणे आदी कामे तसेच वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहनविषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे वायुवेग पथक आदी कामकाज सुरू करण्यात यावे, असे सूचित केले आहे. गत 25 मार्चपासून परवाना आणि इतर कामे बंद होती. यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. आता ही सेवा सुरू झाली असून, नागरिकांना याकरिता अपॉइटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना आयुक्तांकडूनच काही नियमघालून देण्यात आले आहेत.

यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा असे नियम यात देण्यात आले आहेत. लॉकडाउन कालावधीपर्यंत शिकाऊ अनुज्ञप्ती जारी केलेल्या व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे अशा शिकाऊ अनुज्ञप्तींची वैधता 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पक्‍क्‍या अनुज्ञप्ती धारकांची कामे प्राधान्याने करण्यात यावीत. पक्की अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यापूर्वी वाहन सॅनिटाइज केले अथवा नाही याची खातरजमा करण्यात यावी. ही चाचणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहनावर केल्यास एका चाचणीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे, अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करून चालक परवाना देण्याचे काम होणार आहे.

कार्यालयातून वाहन चालक परवाना देण्याकरिता शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यात दिलेल्या अटीनुसार कामे करावी. वाहन चालक परवाना देताना याकरिता कुठल्याही शिबिराची मात्र परवानगी देण्यात आली नाही.
 

ऑनलाईन परवागनी आवश्‍यक
वाहन चालकाचा शिकाऊ आणि पक्का परवाना देण्याची कामे गत काही दिवसांपासून बंद होती. ती कामे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याकरिता अर्जदाराला ऑनलाइन परवानगी घेऊन यावे लागणार आहे.
विजय तिरणकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT