ताण  
विदर्भ

आरोग्यदायी मॅसेजेसच्या भडीमाराने मानसिकता जाम; मानसतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

सुधीर भारती

अमरावती : अमुक एका वस्तूचे सेवन केल्याने कोरोना होत नाही, झाल्यास तो त्वरित दुरुस्त होतो. या वस्तूंमुळे ऑक्‍सिजनचा स्तर वाढतो, अशाप्रकारच्या अनेक आरोग्यमय मॅसेजेसचा सध्या सोशल मीडियावर भडीमार सुरू आहे. विशेष म्हणजे अपवाद वगळता अनेक घरेलू उपचारांना फारसा शास्त्रीय किंवा वैद्यकीय आधार नसतानाही सध्याच्या परिस्थितीत अनेकजण त्याचे तंतोतंत पालन करताना दिसून येतात.

एकूणच आरोग्यमय मॅसेजेसच्या मागे मानसिक कारणे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सोशल मीडियावरून घरगुती उपचारांचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक टीप्स तसेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सकाळी उठून काय खावे येथपासून ते रात्री झोपतानापर्यंतच्या संपूर्ण क्रिया कशा कराव्यात, याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे.

वास्तविक भारतीय संस्कृतीमध्ये घरगुती उपाययोजनांचे एक विशेष स्थान आहे. अनेक उपाय कोरोनापासून बचावासाठी उपयुक्त आहेत, असे विशेषज्ञसुद्धा सांगतात. मात्र बहुतांश वेळा फारसा आधार नसलेले मॅसेजेस व्हायरल होत असतात आणि अनेकजण त्यातील उपाययोजना कसोशीने पाळताना दिसतात. परंतु त्याचा अतिरेक झाल्यास मानसिक आजाराला कारमीभूत ठरू शकतात.

वास्तविक भारतीय घरगुती उपाययोजना प्राचीन काळापासून सुरू आहे. त्यामुळे ती निरुपयोगी आहे असे म्हणता येणार नाही. अनेक घरगुती उपचारांनी जंतूंचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, हे वेळोवेळी संशोधनांनी सिद्ध झाले आहे. मात्र जेव्हा याचा अतिरेक होतो तेव्हा चिंताविकारामध्ये वाढ होत जाते. प्रत्येकाला जीवन जगावेसे वाटते. त्यामुळे आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकजणच धडपडत असतो. त्यात गैर काहीच नाही. केवळ कुठल्याही गोष्टींचा अतिरेक होता कामा नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

-डॉ. अमोल गुल्हाने, मानसोपचारतज्ञ

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीप्रकरणी पेटाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; २५ हजारांचा दंड, रक्कम उपचारांसाठी वापरण्याचे आदेश

CJP Protest : दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द; CJP आंदोलनापूर्वी राजधानीत कडक सुरक्षा, प्रवाशांचे हाल!

नाना पाटेकरांच्या मृत्यूची अनैसर्गिक म्हणून नोंद; गोवा पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू, कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार

Maharashtra Live News : शालेय बस शुल्कासाठी युपीआय बंद

Flipkart BBD Sale मध्ये iPhone अन् Samsung वर बंपर डिस्काउंट; AC ही मिळतोय स्वस्त, पाहा भन्नाट ऑफर्स

SCROLL FOR NEXT