permission granted for well developed library in amravati 
विदर्भ

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, महापालिकेच्या वाचनालयास मंजुरी

कृष्णा लोखंडे

अमरावती : महापालिकेने बांधलेल्या वाचनालयांमधून उच्च शिक्षण घेणारे तसेच स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच एक सुसज्ज वाचनालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मनपाच्या महिला व बालकल्याण विभागाने पाचही झोन कार्यालयांतर्गत एक संपूर्ण सोयीसुविधा असलेले वाचनालय तयार करण्याचा  निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे.

मनपाद्वारे संचालित वाचनालयांमध्ये अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. ते बघता मनपाकडून विद्यार्थी व स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी सर्व सोयींयुक्त अद्यावत वाचनालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सुलभ होणार आहे.

सध्या शहरातील बहुतांश विद्यार्थी अमरावती विद्यापीठ, काही खासगी संस्थांद्वारे संचालित वाचनालयांवर अवलंबून आहेत. यापैकी बहुतेक वाचनालये शहरापासून लांब आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना तेथे जाणेयेणे करणे महागडे ठरते. तसेच विद्यार्थ्यांना वाचनालयांचे शुल्क भरणेही परवडत नाही. ते बघता शहरातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व पुस्तके व सोयी मिळतील याचा विचार करूनच अद्यावत वाचनालय तयार केले जाणार आहे. यात स्पर्धापरीक्षांसह उच्च शिक्षणासाठी आवश्‍यक असलेली सर्व प्रकारची पुस्तके, डिजिटल वाचनालय अशा सुविधा टप्प्याटप्याने निर्माण केल्या जाणार आहेत.    

ग्रंथसंपदा वाढविणार -
महापालिकेच्या वाचनालयांमध्ये मुख्यत्वे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करीत असतात. त्यांना वेळेवर जर काही पुस्तकांची आवश्‍यकता भासली तर ती खरेदी करावी लागतात किंवा इतर कोणाकडून मिळवावी लागतात. यात त्यांचा वेळ वाया जातो. ते बघता ग्रंथसंपदा वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

Vastu Shastra: आठवड्याच्या 'या' दिवसांत पैशाचे व्यवहार करू नका, वास्तुशास्त्रात सांगितले महत्त्वाचे नियम

Horoscope : 2026 वर्ष सुरू होताच बनतोय लक्ष्मी-कुबेर धनलाभ योग; 6 राशींच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, अडकलेली कामे होणार पूर्ण

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने विधिवत प्रारंभ

SCROLL FOR NEXT