liquor shop line in akola.jpg 
विदर्भ

अबब! काय ती शिस्त, काय तो संयम...सारं काही आदर्शवतच!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आज सकाळ उगवली ती शंभर टक्के शुद्ध खूषखबर घेऊन. दोन दिवस थोडी भ्रमनिराशा झाली होती, मात्र आज सकाळी दहाचा ठोका चुकणार नाही. शटर उघडले जाणारच, यावर शिक्कामोर्तब झाले होते. मागे वळून पाहताना 24 मार्च आठवत होता... गेली 42 दिवस ‘घेतली’ नाही, असे सांगणारे हजारो लोक आता ‘घेऊच’ या इराद्याने पिशव्या तयार करून काटा दहावर येण्याची वाट पहात होते.

स्थळ होते मूर्तिजापूर मधील मुख्य रस्त्यावरील...तो क्षण आलाच. एकच गर्दी उसळली... लोक त्या दिशेने धावायला लागले. अन्यत्र अशी गर्दी उसळली असतील तर हमखास चेंगराचेंगरी झाली असती. पण, काय ती शिस्त, काय तो संयम. सारे आदर्शवत. आपण साऱ्यांनी सहा फुटाचे अंतर राखले पाहिजे, याची काटेकोर दक्षता घेत या युद्धातील आपण फायटर्स आहोत, अशा शिस्तीत सारे उभे होते. कुणीतरी फुटकळ आगाऊपणा केला तर सारे एका सूरात त्याला ओरडत होते.

हे सारे घडत होते ग्रामीण भागातील मद्य विक्रीच्या दुकानापुढे. भर दुपारी. तळपते उन्ह. घामाच्या धारा... पण संयमाची परीक्षाच ती. रांग किमान अर्धा किलोमीटरहून अधिक होती. गर्दी खूप होतेय, हे लक्षात आल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ आणि त्यांचे पथक अधून मधून फिरत होते. या पथकाला राग आला तर काही खरे नाही, उगाच कुलुप बंद रहायचे' ही भिती मनात दाटली. मग काय, लोकांच्या शिस्तीला आणखी धार चढली. तोंडातून चकार शब्द निघेना. गोंधळाची तर सूतराम शक्‍यता नाही. मॅडमनी पाहणी केली. सूचना दिल्या. साऱ्यांच्या हातावर सॅनिटायझर मारले. दुकानावर शिंपडले. शुद्ध केले आणि मग सुरू झाली महाविक्री...

या संकट काळात देशातील अर्थव्यवस्थेचा ‘कणा’ म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे, अशा मद्यविक्रीचा बाजार तेजी पकडू लागला. लोकांनी रांगेतून येत खरेदी केली. दोन-दोन लिटरचे तुंबे... अनेकांनी आयुष्यात ही सर्वात मोठी खरेदी केली असेल. रक्कम तर काय थोडी थोडकी की काय ! तब्बल 1300 ते 1400 रुपये. हातातील पिशवीत ती ठेवली आणि हर्षउल्हासित चेहऱ्याने सवारी रवाना झाली. ती सवारी आता घरी जाणार की मित्रांचा अड्डा जमणार, याची आम्ही खातरजमा केली नाही. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या, प्रत्येकाचा प्लॅन वेगळ, मात्र त्यांनी दाखवेली शिस्त आदर्शवतच.

शहरातील अनेकांनी गाठला ग्रामीण भाग
महानगरपालिका हद्दीत दुकाने बंद मग काय चला गावाकडे म्हणत अनेकांनी ग्रामीण भागाकडे गाड्या पीटाळल्या. तोंडावर मास्क हातात जोड्या पिशवी घेऊन अनेक जण रखरखत्या उन्हात रांगेत शिस्तीत उभे होते बाटली घेऊन अनेकांनी आपण अर्थव्यवस्था मजबूत करण्यात योगदान दिले आहे असाही भाव दिसत होते.

अनेकांच्या पदरी निराशा
अव चाळीस पंचेचाळीस दिवस झाले घेतली नाही आता कशाला भर उनात जाऊन जीवाचे हाल करता गृहिणींचे हे शब्द मात्र मी जाणारच जास्त नाही एखादीच आणतो म्हणत अनेकांना दुकान शोधण्यात घरून निघण्यात खूपच उशीर झाला तिकडे वेळ झालेली होती शटर डाऊन झाले आणि यांच्या पदरी आली ती घोर निराशा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT