pig enters into house in wardha  
विदर्भ

बापरे! डुकरांचा थेट घरात प्रवेश, नागरिक त्रस्त

रूपेश खैरी

वर्धा : मोहननगर परिसरात डुकरांचा संचार वाढला आहे. कधी काळी हे डुकरं घरातही शिरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नगरसेविका रंजना सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. यासंबंधी पालिकेचे मुख्याधिकारी विपिन पालीवाल यांना निवेदन दिले आहे.

प्रभाग क्रमांक 4 मोहन नगर येथील सौरभ धनवटे व बीसानी यांच्याकडून परिसरातील डुकरांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी सतत येत आहेत. मोहननगर येथे दिवसेंदिवस हा त्रास वाढत असल्याचे या परिसरातील नागरिकांकडून कळविण्यात आले आहे. येथील नागरिकांना सकाळपासून या डुकरांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या भागात नगरसेविका म्हणून रंजना पट्टेवार काम करीत आहेत. सध्या सकाळपासूनच त्यांच्याकडे डुकरांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नगरसेविका म्हणून अनेकदा आरोग्य विभागाचे विशाल सोमवंशी यांच्याकडे वरील विषयाचा पाठपुरावा करणे सुरूच आहे. परंतु, अद्यापही कायमस्वरूपी न्याय मिळाला नाही. 

केवळ डुकरेच नाही तर सुदामपुरी, मोहिनीनगर परिसरात मोकाट श्‍वानांचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोकाट श्‍वानांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही अद्यापही कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आला नाही. वर्धा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमला त्वरित पाठवून वरील प्रमाणे दोन्ही अतिमहत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांची त्वरित गंभीर दखल घेऊन मोहननगर येथील डुकरांचा व सुदामपुरी, मोहिनीनगर येथील मोकाट श्‍वानांचा त्वरित बंदोबस्त करून प्रभागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT