Pistol thief of API is still not caught by police  
विदर्भ

'एपीआय'चा पिस्टल चोर गवसेना; तब्बल ४ दिवस उलटूनही पोलिस पथकाचे हात रिकामेच

सूरज पाटील

यवतमाळ : पोलिस वर्दीत आलेल्या एका आरोपीने चक्क सहायक पोलिस निरीक्षकाच्या घरातील सर्व्हिस पिस्टलवर हात साफ केल्याची घटना बुधवारी (ता.21) दुपारी दीडच्यादरम्यान येथील बांगरनगर परिसरात घडली. या घटनेमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ निर्माण झाली. गुन्ह्याचा छडा लावण्यात माहिर असलेले अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत. तीन दिवसांनंतरही पिस्टल चोरटा पोलिसांना गवसला नाही. त्यामुळे आता रेखाचित्र जारी करून चोरट्याचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे.

राहुलकुमार राऊत (वय 34, रा. प्रतिबिंब अपार्टमेंट, बांगरनगर, यवतमाळ) असे पिस्टल चोरीला गेलेल्या एपीआयचे नाव आहे. ते स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्थ येत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बुधवारी घरी कुणीही नसल्याची संधी साधून पोलिसांसारखी वर्दी परिधान केलेला 50 वर्षे वयोगटातील एक व्यक्ती घरात आला. 

त्यावेळी घरात केवळ मोलकरीण होती. साहेब, कुठे आहेत, अशी विचारणा केली. घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरचे कुलूप तोडून एपीआय राऊत यांची सर्व्हिस पिस्टल मॅग्जिन हॉलिस्टर व दहा जिवंत काडतुसे, रोख पाच हजार असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी राहुलकुमार राऊत यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चक्क सहायक पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरट्याने हात साफ केला.

 त्यातही पिस्टल चोरून नेल्याने चांगलीच खळबळ उडाली. या घटनेचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शहर डीबी पोलिस पथकाकडून शोध घेतला जात आहे. या पथकात गंभीर घटनांचा छडा लावणारे अधिकारी आहेत. तीन दिवसांत काहीच हाती न लागणारे त्या व्यक्तीचे रेखाचित्र काढण्यात आले. प्रत्येक पोलिस ठाण्यात रेखाचित्र पाठविण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या सांगण्यावरून आरोपीचे मिळते-जुळते वर्णनाप्रमाणे स्केच तयार करण्यात आले आहे. संशयित आरोपी मिळून आल्यास शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
- धनंजय सायरे
पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे, यवतमाळ. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT