police caught thief who stole 34 mobiles  
विदर्भ

मोबाईल चोरी करून सोशल मीडियावर करत होता विक्री; अखेर अट्टल चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या   

संतोष ताकपिरे

अमरावती ः मोर्शी तालुक्‍यातील येरला येथील वैभव नारायण अडोळे (वय २१) याच्याकडून पुन्हा गाडगेनगर पोलिसांनी तब्बल ३४ महागडे मोबाईल हॅण्डसेट जप्त केले. चोरीचा माल घेणाऱ्या वर्धा येथील व्यापाऱ्यासह त्याचे अमरावती येथील नातेवाईक अशा तिघांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली.

वैभव जेव्हा जेव्हा पोलिसांच्या हाती सापडतो तेव्हा तेव्हा पोलिसांनी एक किंवा दोन नव्हे तर दहाच्या वरच मोबाईल त्याच्याकडून जप्त केले. जे ३४ मोबाईल वैभवने चोरले त्यांची किंमत ३ लाख ४३ हजार रुपये आहे. या व्यतिरिक्त दुचाकीचा शौक पूर्ण करण्यासाठी त्याने नागपूर येथून ड्रीम निओ कंपनीची दुचाकीसुद्धा चोरून अमरावतीत आणली. त्या दुचाकीने तो शहरात टेहेळणी करीत होता. 

वैभवने हे मोबाईल गाडगेनगर, राजापेठ व फ्रेजरपुरा या तीन ठाण्यांच्या हद्दीतील घरांमधून चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या मोबाईलपैकी काही पंचेचाळीस, पन्नास तर बरेच पंचवीस हजार रुपये किमतीचे आहेत, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

वैभवने हे मोबाईल शिवाजी चौक वर्धा येथील मोबाईल शॉपीचा संचालक शेख असलम शेख नूर याला विकले होते. शेख असलमचा नातेवाईक मोईन खान अजीज खान (वय २०, रा. अलीमनगर) याने शेख असलम याच्या माध्यमातून हे मोबाईल स्वीकारले होते. तिघेही गाडगेनगर पोलिसांच्या कोठडीत आहेत.

चोरीच्या मोबाईलची माहिती ओएलएक्‍सवर

वैभवने जे ३४ मोबाईल चोरले ते फायनान्स कंपनीने जप्त केल्याचे सांगितले. ते विकण्यासाठी ओएलएक्‍सवर माहिती टाकली. त्याने स्वत:चे नाव वैभव ऐवजी विष्णू असल्याचे शेख असलमसोबत व्यवहार करताना सांगितले.

कारागृहातून सुटताच पुन्हा चोरी

लॉकडाउनच्या काळात वैभवला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली होती. दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटताच तो नागपूरला गेला. तेथून दुचाकी चोरून अमरावतीत परतल्यावर बापटवाडीत भाड्याची खोली करून राहत होता.


संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

SCROLL FOR NEXT