police caught truck with illegal wine worth rupees 46 lacs  
विदर्भ

औरंगाबादमधील दारूतस्करीचा यवतमाळात पर्दाफाश; बंदी असलेल्या जिल्ह्यात पाठवण्याचा डाव फसला

सूरज पाटील

यवतमाळ : औरंगाबादमध्ये निर्माण होणार्‍या दारूची बंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांत दारूतस्करी होणार होती. मात्र, या तस्करीचा यवतमाळात पर्दाफाश झाला. पोलिसांनी एकूण 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई यवतमाळ शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी केली.

रेडिको एनव्ही डिस्टिलरीज महा. लिमिटेड कंपनीचे मालक, एनसीसी लॉजिस्टिक नाशिकचे मालक अमन चौधरी, ट्रक वाहन मालक गोकुल वाखुरे (रा. औरंगाबाद), चालक योगेश लघाने यांच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.18) रात्री यवतमाळ शहर पोलिस ठाण्याचे पथक पेट्रोलिंगवर असताना धामणगाव मार्गावरील नारिंगेनगर येथे एक ट्रक उभा असल्याची माहिती मिळाली. 

लगेच पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिस दिसताच दोघांनी कॅबिनमधून उतरून पळ काढला. ट्रकमधून दारूसारखा आंबट व उग्र वास येत असल्याने पोलिसांना अवैध दारूतस्करीचा संशय आला. रात्रीच्या वेळी वाहन रस्त्यावर उभे ठेवणे शक्य नसल्याने क्रेनच्या सहाय्याने शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. ठाणेदार धनंजय सायरे यांनी प्राथमिक चौकशी करून पंचांसमक्ष पाहणी केली. 

त्यात विविध विदेशी दारूचा शासनाच्या मूल्यदरानुसार एकूण 36 लाख 85 हजार 761 रुपयांचा मद्यसाठा होता. वाहनाची किंमत दहा लाख रुपये असा एकूण 46 लाख 85 हजार 761 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक के. ए. धरणे, एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनंजय सायरे, रवी आडे, राजकुमार कांबळे, अमित कदम, प्रवीण उईके, अंकुश फेंडर, अन्सार बेग आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

‘एक्साईज’चा मार्गच बदलला

एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क विभाग)च्या अधिकार्‍यांनी वाहतूक परवान्यासाठी औरंगाबाद-जालना-नांदेड असा मार्ग दिला होता. मात्र, वर्धा अथवा चंद्रपूर या जिल्ह्यांत दारू नेण्यासाठी चक्क मार्गच बदलण्यात आला. सदर ट्रक हा धामणगाव मार्गावर बंदस्थितीत आढळून आल्याने तस्करीचा हेतू फसला आहे.


संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

SCROLL FOR NEXT