Police investigating case of Doctor Sheetal Amte karjagi  
विदर्भ

डॉ. शीतल आमटे- करजगी यांचं शेवटचं चॅटिंग कुणाशी? पासवर्ड स्वतःचे डोळे ठेवल्यानं वाढल्या अडचणी 

प्रमोद काकडे

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कमालीची चुप्पी साधली आहे. दुसरीकडे आत्महत्येपूर्वी डॉ. शीतल यांनी केलेली चॅटिंग या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरवताना महत्त्वाची ठरणार आहे. पोलिसांनी जप्त केलेले लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल मुंबईच्या सायबर सेलकडे पाठविला आहे. परंतु, या गॅझेटचा पासवर्ड काही दिवसांपूर्वीच बदलला होता. पासवर्ड डॉ. शितल यांनी स्वत:चे डोळे ठेवले होते. त्यामुळे सायबर सेल आता तज्ज्ञांची मदत घेत आहेत.

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. कुटुंबातील बयाण, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यातील कडी जोडली जाईल. त्यानंतर यावर बोलणे योग्य राहील, अशी पोलिसांनी भूमिका घेतली आहे. 

दरम्यान वरोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांनी आज आनंदवनात जाऊन पुन्हा चौकशी केली. परंतु, याचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. डॉ. शीतल यांनी आत्महत्येसाठी कुठले औषध वापरले, हे फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

गौतम करजगींना नव्हती माहिती 

डॉ. शीतल यांचा लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेतले आहे. ते मुंबईतील आयटी तज्ज्ञांकडे पाठविले आहे. डॉ. शीतल या वापरत असलेल्या गॅजेटचे पासवर्ड काही दिवसांपूर्वीच बदलले होते. याची माहिती त्यांचे पती गौतम करजगी यांना नव्हती. काही गॅझेटमध्ये त्यांनी आपले डोळे पासवर्ड ठेवले आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहे. 

सायबर सेलच्या अहवालाची प्रतीक्षा

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुणाशी संवाद साधला. चॅटिंग केले. हे तपासात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सायबर सेलच्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे. त्यानंतर या आत्महत्या प्रकरणाची महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

Latest Marathi News Live Update: कल्याण पूर्वेतील पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य

Medical Admission Scam : वैद्यकीय प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांना सीईटी सेलची नोटीस

Ex-Army Man Own Funeral : ऐकावं ते नवलंच! बाबानं जिवंतपणीच काढली स्वत:ची अंतयात्रा अन् मग स्मशानात पोहचताच...

SCROLL FOR NEXT