police raid on Gambling place and arrest people
police raid on Gambling place and arrest people  
विदर्भ

मकत्याने केलेल्या शेतात रोज रंगायचा जुगाराचा डाव; अखेर पोलिसांनी टाकला मोठा छापा 

सूरज पाटील

यवतमाळ : येथून जवळच असलेल्या जामवाघाडी शिवारात मक्त्याने घेतलेल्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून नऊ जुगारींना अटक करण्यात आली. सोमवारी (ता.24) यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे जुगारींमध्ये खळबळ उडाली आहे.

भूषण गनडीवार (वय 32), सारंग वानरे (वय 45), सचिन लोहीया (वय 42), चंदन मारोटे (वय 35, सर्व रा. चांदूररेल्वे, जि. अमरावती), फईम कादर अन्सारी (वय 36, रा. घाटंजी), प्रवीण उईके (वय40, रा. भांबराजा), विलास भगत (वय35, रा. आकपुरी), नारायण राठोड (वय 56, रा. अर्जुना), शेख आसीफ शेख चांद (वय 35, रा. पारवा) असे अटकेतील जुगारींची नावे आहेत.

पोलिसांची चाहूल लागताच विनोद चव्हाण (रा. यवतमाळ) हा पळून गेला. गुड्डू पहेलवान याचे शेत विनोद चव्हाण नामक व्यक्तीने मक्त्याने घेतले होते. त्या शेतात जुगार भरविला जात होता. ही माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळताच त्यांनी पथकासह खासगी वाहनाने घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरून नऊ जुगारींना अटक केली. 

एक कार, दोन दुचाकी, रोख रक्कम असा एकूण आठ लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारींविरुद्घ यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

परजिल्ह्यातील जुगारींची हजेरी

मक्त्याने शेती घेऊन तेथे जुगार भरविण्याचा फंडा चव्हाण नामक व्यक्तीने अवलंबिला होता. या जुगार अड्ड्यावर अमरावती जिल्ह्यातील जुगारींसह घाटंजी, पारवा व परिसरातील जुगारी हजेरी लावायचे. या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT