विदर्भ

आमदार असावा तर असा; स्वखर्चातून ऑक्‍सिजन प्लांट; पायाभरणीला सुरुवात

सुधीर भारती

अमरावती : आमदार प्रवीण पोटे (MLA Praveen Pote) यांनी कोणत्याही यंत्रणेच्या भानगडित न पडता लोकांना जीवनदान देण्यासाठी स्वखर्चातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये ऑक्‍सिजन प्लांटची (Oxygen plant at Covid Center) पायाभरणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारत आहे. (Praveen Potes own oxygen plant in Amravati)

कोविड रुग्णालयाच्या बी-विंगमध्ये हा स्वदेशी प्लांट कार्यान्वित होत आहे. याला बाहेरून कोणतेही ऑक्‍सिजन सिलिंडर आणून लावण्याची गरज नाही, हा सेल्फ ऑक्‍सिजन जनरेशन करणारा प्लांट आहे. रोज २४ तास ४० बेडला पाइपद्वारे कायमस्वरूपी ऑक्‍सिजन देणारा हा प्लांट असून त्याची किंमत ६५ लाख रुपये आहे. रुग्णांना नियमित सेवा मिळावी म्हणून याची आजीवन देखभाल व मेंटेनन्स प्रवीण आर. पोटे पाटील ट्रस्ट करणार आहे. ऑक्‍सिजन प्लांटच्या कामाला सुरुवात झाली असून आठ आठवड्यांमध्ये रुग्णांच्या सेवेत हा प्रकल्प येत आहे.

हा ऑक्‍सिजन प्लांट पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन ऍण्ड वेल्फेअर ट्रस्ट, स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील यांच्या स्मरणार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत कोरोनाचा मोठा उद्रेक होत असून रुग्णांकरिता ऑक्‍सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. जिल्ह्यातील ही कोविडची भयावह परिस्थिती लक्षात घेऊन लोकांचे प्राण वाचावे यादृष्टीने पी. आर. पोटे पाटील ट्रस्टद्वारे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी ऑक्‍सिजन प्लांट देण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनात, कंपनीचे एक्‍स्पर्ट व मित्रपरिवार यांनी जाऊन सुपर स्पेशालिटी येथे भेट देऊन ऑक्‍सिजन प्लांटकरिता जागा निश्‍चित केली. त्यामुळे या प्लांटच्या पायाभरणीच्या पूर्वतयारीला सुरुवातसुद्धा झाली आहे. प्रवीण पोटे यांनी आमदार या नात्याने वेळेचे महत्त्व लक्षात घेता व सद्यःस्थितीत वेळेचे भान ठेवता कोणत्याही सरकारी माध्यमातून किंवा आमदार निधीतून अथवा कोणत्याही कंपनीच्या फंडातून मदत न घेता स्वखर्चातून हा ऑक्‍सिजन प्लांट जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय केला. त्यामुळे अमरावतीकरांना मोठा आधार मिळणार आहे.

घरातील कर्तापुरुष गेला तर त्या कुटुंबावर काय स्थिती येते, याची जाणीव मला आहे. नागरिकांचे जीव वाचले पाहिजे. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून हा ऑक्‍सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
- प्रवीण पोटे, आमदार, अमरावती

(Praveen Potes own oxygen plant in Amravati)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT