Primary health center relies on laboratory technicians
Primary health center relies on laboratory technicians 
विदर्भ

अजब गावचा गजब कारभार! प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे सलाईनवर

तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : कधी वैद्यकीय अधिकारी नाही, तर कधी कर्मचारी नाही, कधी औषधांचा तुटवडा... हे चित्र आहे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिरोंचाअंतर्गत येणाऱ्या रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे. या केंद्राजवळ स्वत:ची इमारत नसल्याने या केंद्राचा कारभार चक्‍क समाजमंदिरातून चालविला जात आहे. या केंद्रात अनेक सुविधांचा अभाव असून मागील दहा महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्र याच केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ चालवत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

रंगय्यापल्ली गावासह परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी 2013 पासून येथील आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण विभागाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीपासून आजपर्यंत या आरोग्य केंद्रात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना तोंड देत रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कसेबसे सलाईनवर चालत आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने परिसरातील रुग्णांना आरोग्य केंद्रात येऊन परत गावातील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी परत जावे लागत आहे. एखादा रुग्ण आला तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाइलाजाने रुग्णांना गोळ्या देऊन उपचार करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचर अशी अनेक पदे रिक्‍त आहेत. या आरोग्य केंद्रात फक्त एक कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतो आणि त्यांच्या भरवशावर हे आरोग्य केंद्र चालत आहे. त्यामुळे रंगय्यापल्ली परिसरातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. जून-जुलै महिना पावसाळ्याचा असल्याने या काळात रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. त्यात आता कोरोनाच्या महामारीचे थैमान सुरू आहे. याशिवाय मलेरिया, टॉयफाईडसारख्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि औषध कर्मचारी असणे आवश्‍यक आहे. मात्र, शासनाच्या नियोजनशून्यतेमुळे रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे चालत आहे.

बांधकाम झाल्यावर भरणार पदे

या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेबद्दल तालुका आरोग्य अधिकारी एम. पी. कन्नाके यांना विचारणा केली असता या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या असल्याचे त्यांनी मान्य केले. येथील वैद्यकीय अधिकारी गेडाम यांची लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच रंगय्यापल्ली येथील नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू असून बांधकाम पूर्ण झाल्यावर येथील रिक्त पदे भरण्यात येतील, अशी माहितीही कन्नाके यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT