Abhay Bang 
विदर्भ

दारूबंदी अपयशी की मंत्री? डॉ. अभय बंग यांची विजय वडेट्टीवारांवर प्रश्‍नांची सरबत्ती 

मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्यात २७ वर्षांपासून असलेली दारूबंदी उठविण्यासाठी राज्याचे आपत्ती निवारणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रथम मागणी केली व आता समिती स्थापन करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, दारूबंदी अपयशी की, मंत्री अपयशी, असा सवाल करीत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी वडेट्टीवारांवर प्रश्‍नांची सरबत्तीच केली आहे. 

पत्रकात डॉ. बंग यांनी वडेट्टीवार यांना म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी अयशस्वी झाल्याचे तुम्ही म्हणत आहेत. बेकायदेशीर दारू प्रचंड वाढली. विषारी दारू पिऊन खूप माणसे मरत आहेत. दारूबंदी हा शासकीय कायदा आहे. १९९२ मध्ये काँग्रेस सत्तेत असताना घेतलेला मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्याच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी शासनाची म्हणजे पर्यायाने मंत्री म्हणून तुमची आहे.

दारूबंदी अयशस्वी झाल्याची जी वर्णने तुम्ही करता, ती जर खरी असतील तर ते मंत्री म्हणून तुमच्याच अपयशाचे वर्णन आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून व आता-आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शासकीय दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले? जर शासकीय निर्णयाची तुम्हाला नीट अंमलबजावणी करता येत नसेल तर तुम्ही स्वत:ला ‘अपयशी मंत्री' घोषित कराल का? 

डॉ. बंग म्हणाले, तुम्ही राज्याचे आपत्ती-सहायता मंत्री आहात. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाची मोठी आपत्ती आली आहे. गावोगावी हजारो माणसे आजारी पडत आहेत. ही भयंकर आपत्ती निवारण्याऐवजी तुम्हाला अचानक दारूबंदी सर्वांत मोठी आपत्ती का वाटते? ती उठवण्यात तुम्हाला एवढा रस का? मुंबईत ड्रग्जचे जाळे पसरले आहे, हे टीव्हीवरून जाहीर होत आहे. महाराष्ट्रात ड्रग्जविरोधी कठोर कायदा आहे. त्याच न्यायाने ‘ड्रग्जबंदी अपयशी झाली, तिला उठवा' अशी मागणी तुम्ही केव्हा करणार आहात, असा टोलाही त्यांनी मारला. 

राज्यात गुटखाबंदी व सर्व प्रकारची सुगंधित तंबाखूबंदी लागू आहे. तरीही सर्वत्र रस्त्यांवर, चौकांमध्ये, पानठेल्यांवर खुलेआम खर्रा, मावा, सुगंधित तंबाखू विकला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा सर्वेक्षणानुसार अवैध दारूपेक्षा पाचपट अधिक अवैध तंबाखू विकला जात आहे. ती विक्री थांबविण्यासाठी समिती स्थापन का करीत नाही? अशा प्रश्‍नांची सरबत्तीच डॉ. अभय बंग यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्यावर केली आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT