Protest against IIMC Amravati Lecturer as he criticized Mahatma Gandhiji  
विदर्भ

IIMCच्या प्राध्यापकाविरोधात ठिय्या आंदोलन; महात्मा गांधींना म्हंटलं होतं ''पाकिस्तानचे पिता'

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : भारतात कोण, कधी आणि कोणत्यावेळी करेल हे काहीही सांगता येत नाही. नेहमीच लोकं आपल्या राष्ट्रपुरुषांबद्दल किंवा दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त विधान करत असतात. असाच प्रकार अमरावतीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये घडला आहे. ज्यामुळे काही संघटनांनी इथल्या प्राध्यापकांच्या विरोधात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये येथील प्राध्यापक अनिलकुमार सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना संबोधून वादग्रस्त विधान केलं आहे. "महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता असून त्यांच्या सारखे करोडो पुत्र आहेत काही लायक आहेत तर काही नाहीत. तसंही महात्मा गांधी हे भारताचे पिता होऊच शकत नाही" असं सौमित्र यांनी म्हंटलंय त्यामुळे  युवक काँग्रेस , विर भगतसिंग विद्यार्थी परिषद , ए.आय.एस.एफ. , सष्ट्रवादी युवक काँग्रेस , एन.एस.यु.आय , प्रहार विद्यार्थी संघटना , टिपु सुलतान सेना , सष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस यासारख्या काही संघटनांनी IIMC मध्ये ठिय्या आंदोलन पुकारलं आहे. 

पत्रकार आणि प्रसारण माध्यम हे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे  त्यामुळे अशसी विचारांच्या प्राध्यापकाला IIMC नं नोकरी देणं वाईट आहे. लोकशाहीचा हा स्तंभ वाचविण्यासाठी प्रा.अनिलकुमार सौमित्र यांची ५ दिवसात तातडीनं हकालपटटी करण्यात यावी असा ईशारा देत हे आंदोलन सुरु आहे. 

अनिलकुमार सौमित्र हे संघ आणि भाजपच्या विचारसरणीचे आहेत त्यामुळे त्यांचे विचार हे देशाच्या हिताचे नाहीत. तसंच IIMC मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही सौमित्र यांचे विचार घातक आहेत असंही विरोधकर्त्या संघटनांच म्हणणं आहे त्यामुळे सौमित्र यांची लवकरात लवकर हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा ईशाराही या संघटनांनी दिला आहे. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT