file photo 
विदर्भ

दीड लाख क्‍विंटल कापूस खरेदी ; नोंदणी साडेतीन लाख शेतकऱ्यांची

रुपेश खैरी

वर्धा  : लॉकडाउननंतर कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यात कापूस पणन महसंघ आणि सीसीआय असे मिळून दीड लाख क्‍विंटल कापसाची खरेदी या 14 दिवसांत झाली आहे. कापूस खरेदीत पणन महासंघाने आघाडी घेत आतापर्यंत 1 लाख 16 हजार क्‍विंटल कापूस खरेदी केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी खरेदी सुरू झालेल्या सीसीआयने एकूण 35 हजार क्‍विंटल कापसाची खरेदी केली आहे. 

कापूस खरेदी शेतकऱ्यांकरिता दिलासा देणारी

कापूस खरेदी शेतकऱ्यांकरिता दिलासा देणारी ठरली असली तरी अद्याप बरेच शेतकरी रांगेत आहेत. शासनाने काही नियम व अटी ठेवत कापूस खरेदी सुरू करण्याच्या सूचना केल्या. कापूस संकलन केंद्रात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता पहिले नोंदणी करण्याच्या सूचना केल्या. या सूचनेनुसार पणन महासंघ आणि सीसीआयकडे एकूण साडेतीन लाख कापूस उत्पादकांनी नोंदणी केल्याचे पुढे आले आहे. यातील मोजक्‍याच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झाला असून उर्वरित शेतकऱ्यांना खरेदीची प्रतीक्षा आहे. 

कापूस पणन महासंघाकडून केवळ 54 केंद्रांवरून खरेदी 

कापूस खरेदी सुरू झाली असली तरी खरेदी करणाऱ्या दोन्ही एजन्सीकडून अद्याप खरेदीचे पूर्ण केंद्र सुरू करण्यात आले नाही. यात कापूस पणन महासंघाकडून केवळ 54 केंद्रांवरून खरेदी सुरू करण्यात आली आहे. लॉकडाउनपूर्वी पणन महासंघाकडून 74 केंद्रांवरून कापसाची खरेदी करण्यात आली होती. तर सीसीआयकडून सध्या 36 केंद्रांवरून खरेदी करण्यात येत आहे. त्यांचे काही केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

लॉकडाउन होताच कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली. अनेक शेतकऱ्यांच्या घरीच कापूस पडून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. शिवाय खरीप हंगाम तोंडावर आला असताना जुनाच कापूस घरी पडून असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. तसेच घरीच पडून असलेल्या कापसामुळे काही आजारही डोके वर काढत असल्याचे दिसून आले. यामुळे कापूस खरेदीला हिरवी झेंडी देण्यात आली. आतापर्यंत झालेली कापूस खरेदी ही नगण्य असून सुरू असलेल्या कापूस खरेदीची गती वाढविण्यात यावी अशी मागणी होत आहे. 
 
लॉकडाउनपूर्वीची खरेदी 103 लाख क्‍विंटल 

लॉकडाउन घोषित होण्यापूर्वी राज्यात 103 लाख क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यात सीसीआयचे सब एजंट म्हणून काम करणाऱ्या पणन महासंघाने 55 लाख 74 हजार क्‍विंटल आणि सीसीआयने 47.50 लाख क्‍विंटल कापसाची खरेदी केली आहे. झालेल्या खरेदी एवढाच कापूस आणखी बाकी असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कापूस पणन महासंघाची सध्या 54 केंद्रांवरून खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ए लाख 16 हजार क्‍विंटल कापूस खरेदी झाली आहे. येत्या दिवसात आणखी केंद्र सुरू करण्यात येईल. यामुळे खरेदीचा आकडा वाढेल. 
- राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष कापूस पणन महासंघ 

काही तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी सुरू करण्यास विलंब झाला. दोन दिवसांपासून एकूण 36 केंद्रांवरून एकाच वेळी कापूस खरेदी सुरू झाली आहे. येत्या दिवसात आणखी केंद्र सुरू होईल. लवकरच सीसीआय पणन महासंघापेक्षा अधिक कापूस खरेदी करेल. 
- अजयकुमार, व्यवस्थापक, सीसीआय  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT