Refuse secondary grade cotton in Yavatmal district 
विदर्भ

शेतकऱ्यांचे वांदे : दुय्यम दर्जाच्या कापसाला नकार; आठवडाभरात २,४०० क्विंटलच खरेदी

कृष्णा लोखंडे

अमरावती : कापूस खरेदीची जिल्ह्यात पाच शासकीय केंद्र सुरू झाली असली तरी आतापर्यंत केवळ २,४०० क्विंटल कापूस खरेदी होऊ शकला आहे. टप्प्याटप्प्याने ही केंद्र सुरू झाली आहे. खासगी केंद्रांवरही कापसाची आवक फार मोठ्या प्रमाणात नसल्याने यंदा कापसाची बाजारपेठ फुलण्याची शक्‍यता कमी असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

अमरावतीसह अचलपूर, मोर्शी, वरूड व दर्यापूर येथे शासकीय खरेदी केंद्र गेल्या आठ दिवसांत सुरू झाली आहेत. एक डिसेंबरला सर्वांत अखेरचे अचलपूर येथील केंद्राचा शुभारंभ झाला. अमरावतीच्या कामूंजा येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगमध्ये १२५ क्विंटल ६० किलो, दर्यापूरच्या सदगुरू जिनिंगमध्ये १,२५४ क्विंटल ३४ किलो, मोर्शी केंद्रावर ६२.६५ क्विंटल, वरूड येथील केंद्रावर २२५.७५ क्विंटल व अचलपूर येथील केंद्रावर १२४.१० क्विंटल कापसाची आवक झाली आहे.

हमीदराने हा कापूस खरेदी करण्यात आला असून, आतापर्यंत १३ कोटी ६८ लाख रुपयांची खरेदी झाली आहे. कापसाला ५,२७५ रुपये प्रती क्विंटल हमीदर आहे. यंदा गतवर्षीसारखा हंगाम राहणार नसल्याची शक्‍यता आहे.

खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या नगदी पिकांवर अतिपाऊस व नंतर बोंडअळी, बोंडसरीने आक्रमण केल्याने नुकसान केले आहे. पाच फुटापर्यंत उंची गाठणाऱ्या कापसाच्या पिकावरील बोंड गळलेत.

परिणामी उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतही घसरली. कापसाच्या आवकीचा उच्चांक गाठणाऱ्या कालावधीत केंद्रावर कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

एफएक्‍यू, एलआरए दर्जाचाच कापसाची खरेदी

शासकीय केंद्रावर सीसीआयच्या निकषांप्रमाणे केवळ एफएक्‍यूव एलआरए दर्जाच्या कापसाची खरेदीला केली जाते. या प्रतीच्या कापसातूनच अपेक्षित उतारा मिळत असल्याचा दावा असल्याने दुय्यम दर्जाचा नाकारला जातो. यंदा अतिपावसामुळे उत्पादन घसरण्यासोबतच प्रतही खालावली आहे. मात्र, तो नाकारण्याइतकी प्रत खालावली नसल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. तो दुय्यम दर्जाचा कापूस एलआरए २ अशी श्रेणी करून खरेदी करावा अशी मागणी आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT