कामठी ः अर्ज सादर करण्याच्या दिवशी उमेदवारांनी केलेले शक्‍तिप्रदर्शन.  
विदर्भ

कॉंग्रेसने तिकीट नाकारल्याने अनेकांची बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर) : अखेरच्या दिवसापर्यत जि.प.च्या चार गटाकरिता 37 उमेदवारांनी 40 नामांकन अर्ज सादर केले. पं. स.च्या आठ गणाकरिता 52 उमेदवारांनी 54 नामांकन अर्ज दाखल केले. तालुक्‍यात कॉंग्रेस पक्षाने इच्छुकांची तिकीट नाकारल्याने अनेकांनी बंडखोरी केल्याचे दिसून आले. तर येरखेडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपच्या प्रशांत ऊर्फ बाल्या काळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसच्या अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली.

माजी आमदार पुत्र डॉ.रडके रिंगणात

जिल्हा परिषदेअंतर्गत कामठी तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. यात कोराडी, येरखेडा, गुमथळा व वडोदा या सर्कलचा समावेश होतो. सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या कोराडी जिल्हा परिषद गटाकरिता 15 उमेदवारांनी 18 नामांकन दाखल केले. यात प्रामुख्याने कॉंग्रेसचे नाना कंभाले, भाजपचे संजय मैंद तर अपक्ष वामन भडंग यांचा समावेश आहे. येरखेडा जिल्हा परिषद गटाकरीता 10 उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यात प्रामुख्याने कॉंग्रेसच्या प्रशांत ऊर्फ बाल्या वसंतराव काळे, भाजपचे मोहन माकडे तर अपक्ष माजी आमदार देवराव रडके यांचे पुत्र डॉ. विजय रडके यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या गुमथळा जिल्हा परिषद सर्कलकरिता 8 उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यात कॉंग्रेसचे दिनेश ढोले व भाजपचे अनिल निधान तर अपक्ष अंबर वाघ यांचा समावेश आहे. वडोदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असलेल्या सर्कलमध्ये 4 महिला उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यात कॉंग्रेसतर्फे प्रा. अवंतिका लेकुरवाळे तर भाजपतर्फे अनिता चिकटे तर अपक्ष रेखा राघोर्ते यांचा समावेश आहे.

महिला राज
कामठी पंचायत समितीच्या आठ गणाकरिता 52 उमेदवारांनी 54 नामांकन अर्ज दाखल केले. यामध्ये कोराडी, कवठा, येरखेडा, भिलगाव, गुमथळा, महालगाव, वडोदा व बिडगाव या गणांचा समावेश आहे. पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी यात आठपैकी चार गण महिलांसाठी राखीव आहेत. यातील सर्वसाधारण प्रवर्गाकरिता असलेल्या येरखेडा येथे 11, भिलगाव येथे 6, वडोदा येथे 8 उमेदवारांनी नामांकन दाखल केले. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या कोराडी गणाकरिता 5 तर गुमथळा गणाकरिता 6 उमेदवारांनी 7 नामांकन अर्ज दाखल केले. बिडगाव नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव असून यात 5 उमेदवारांनी तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलासाठी राखीव असलेल्या महालगाव गणाकरिता 6 तसेच कवठा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या गणाकरिता 5 उमेदवारांनी 6 अर्ज दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT