Results of Gram panchayat Elections tomorrow
Results of Gram panchayat Elections tomorrow  
विदर्भ

उमेदवारांच्या हृदयाचे वाढले ठोके; कोण मारणार बाजी? उद्या होणार मतमोजणी

सुधीर भारती

अमरावती ः जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.15) मतदान शांततेत पार पडले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती सोमवारी  होणाऱ्या मतमोजणीची. त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

अमरावती तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी विलासनगरच्या शासकीय धान्य गोदामात होणार आहे. अचलपूरची मोजणी परतवाडा मार्गावरील कल्याण मंडपम्‌ , चांदूर बाजार, दर्यापूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, वरुड व अंजनगाव सुर्जी या तालुक्‍यांची मोजणी संबंधित तहसील कार्यालय परिसरात, धारणी तालुक्‍याची मोजणी कुसुमकोट बु. येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात होईल. 

चिखलदराची गणना नगर परिषद गेस्ट हाऊस परिसर, मोर्शीची मोजणी शिवाजी उच्च माध्यमिक शाळा परिसर, नांदगाव खंडेश्वरची मोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिवसा तालुक्‍याची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात, भातकुलीची मोजणी अमरावती शहरातील चपराशीपुरा स्थित पालिकेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 13 मध्ये होईल. 

मतमोजणीच्या ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मतमोजणीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात 18 जानेवारीच्या सकाळी 8 वाजतापासून ते मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT