Retired ST employees have been waiting for arrears for a year and a half 
विदर्भ

एसटी कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरही परवड, दीड वर्षांपासून थकबाकीच्या प्रतीक्षेत 

योगेश बरवड

नागपूर  ः जनसेवेत आयुष्य झिजविणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण देयकांसह सन्मानाने निवृत्ती दिली जाते. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वाट्याला मात्र हा योग अजून जुळून आला नाही. गेल्या दीड वर्षांमध्ये निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही रजारोखीकरण व वेतनवाढीतील फरकाची थकबाकी मिळू शकली नाही. आम्हला सन्मानाने निवृत्ती का नाही?, असा परखड सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दरवर्षी राज्य सरकारचे सुमारे तीन टक्के कर्मचारी निवृत्त होतात. निवृत्तीचे हेच प्रमाण एसटी महामंडळीतही आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी सर्वप्रकारची थकबाकी मिळावी, हा प्रयत्न असतो. एसटीच्या कार्यपद्धतीनुसार पीएफ व ग्रॅज्युएटीची रक्कम मुख्यालयाकडून काढली जाते. तर, रजारोखीकरण व वेतनवाढीच्या फरकातील थकबाकीचा हिशेबाची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर असते. 

एसटीच्याच बऱ्याच विभागांमध्ये संपूर्ण रक्कम एकाचवेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती पडते. नागपूरच्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला मात्र परवड आली आहे. जून २०१९ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात अजूनही शिल्लक रजा व वेतनवाढीतील फरकाची थकबाकी मिळू शकली नाही. प्रतिकर्मचारी साडे तीन ते चार लाखांच्या घरात ही रक्कम आहे.

कोरोना काळात गरज पडूनही हक्काची ही रक्कम मिळू न शकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. अनेकांनी या रकमेतून मुलाबाळांच्या भवितव्यासाठी नियोजनाची योजना आखून ठेवली आहे. पण, रक्कम कधी मिळेल याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने त्यांचा नाइलाज झाला आहे. कामगार संघटनांकडूही वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला. पण, कोरोनाच्या संकटाचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे.
 

हक्काची रक्कम तत्काळ अदा करा 
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाजूचा विचार करून हक्काची ही रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी. मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांकडून यासंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला. पण, अद्याप प्रशासनाला तोडगा काढता आला नाही.
पुरुषोत्तम इंगोले, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. 

संपादित - अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT