कारंजा (जि.वाशीम) : कुठलाही अनुचित प्रकार घडो, घटना घडो, भांडण-तंटे, आपत्ती, असो, वा अपघात...यामध्ये, मदतीकरिता अग्रस्थानी असते पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन नि समाजसेवक आज रोजी कोरोनाने संपूर्ण जगाला वेढले असताना या त्रिकुटांची भूमिका इतिहास बनविणारी ठरत आहे. कारंजा शहरात सुद्धा पोलिस- महसूल-समाजसेवक या त्रिकुटांनी एकत्र येत समन्वयाच्या जोरावर एका साडेतीन वर्षीय चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणत तिचा प्राण वाचविला आहे.
पोलिस म्हटले की, निष्ठुर, दंडुकेशाही, दयामाया, भूतदया यापासून वंचित असलेला विभाग या दृष्टीनेच समाज या विभागाकडे पाहत असतो. सध्या संपूर्ण जगात कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे, या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्हाच्या सीमाबंद करून नागरिकांना घरात बसविण्यासाठी महसूल प्रशासनाने दंडात्मक कारवाई तर, पोलिसांनी दंडुकेचा प्रसाद देण्याचा सपाटा लावल्याने नागरिकांची आजच्या घडीला यांच्या प्रतीचा दृष्टिकोनच बदलला आहे.
आवश्यक वाचा - अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला 'मुळशी पॅटर्न'
कारंजा पोलिस प्रशासनाने आम्हाला सुद्धा माणुसकी, सामाजिक जाणीव असते याबाबीचा प्रत्यय शहरातील सास या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने कारंजा येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचविण्यासाठी तिला शासन प्रमाणित परवानगी शिवाय, अमरावती जिल्ह्यात प्रवेश मिळवून दिल्याने या त्रिकूटांचे कौतुक होत आहे. कारंजा तालुक्यातील ग्राम म्हसनी येथील तीन वर्षीय स्मिताली सुरुजसे चिमुकलीला अचानक ताप आला होता. त्यावर, आई-वडील यांनी तिचा कारंजा येथे एका खासगी रुग्णालयात उपचार करून तिला पुन्हा घरी नेले. परंतु, ती पुन्हा या तापात फणफणत असताना तिला उपचाराकरिता कारंजा येथे आणले. मात्र, ताप वाढत असल्याने शिवाय, श्वास घेण्यास तिला त्रास होत असल्याने, शिवाय ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिला अमरावतीमध्ये तास भरात घेऊन जावे अन्यथा तिच्या जीवित्वाला धोका असल्याचे खासगी डॉक्टरांनी याठिकाणी, उपस्थित समाजसेवक श्याम सवाई यांना व नातेवाइकांना सांगितले.
मात्र, सीमाबंदी असल्याने शिवाय, शासनाने रुग्ण वाहिकेला सुद्धा ई-पास शिवाय सीमा उल्लंघन करता येत नसल्याने ही पास मिळविण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. यावेळी, सवाई यांनी तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या मार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी, या त्रिकुटांनी समन्वयाची भूमिका घेऊन यातून मार्ग काढत त्या चिमुकलीला अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून एक प्रकारे स्मिताली हिला या संकटकाळी संकटमोचनाची भूमिका महसूल, पोलीस प्रशासनाने योग्यरीत्या पार पाडल्याने त्यांचे कार्याचे कौतुक केल्या जात आहे.
यांचे लाभले सहकार्य...
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश पाटील,तहसीलदार धीरज मांजरे, सास प्रमुख श्याम सवाई, तसेच, रमेश देशमुख, श्याम घोडेस्वार, संतोष घुले, अमोल गोडवे यांच्यासह इतरही काही मंडळीचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.