khamgaov swachata. 
विदर्भ

करण सेलरका म्हणाले स्‍वच्‍छतेचे नियम कटाक्षाने पाळा

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलडाणा) : स्थानिक गो. से. महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाद्वारे सोमवारी 9 मार्च रोजी भारतासाहित संपूर्ण जगाला हादरवून टाकलेल्या कोरोना विषाणू विषयी शास्त्रोक्त माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, त्याबद्दलचे गैरसमज व भीती दूर व्हावी, या प्रमुख उद्देशाने अशा परिस्थिती ‘आपण काय करावे व काय करू नये’ या विषयावर करण सेलरका यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सेलरका गो. से. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, ते सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी पुणे येथे फेलोशिपवर कार्यरत आहेत. दरम्यान, सेलरका यांनी सांगितले की, कमीतकमी 20 सेकंद साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा आणि लहान मुलांना असे करण्यास मदत करा.

महत्त्वपूर्ण माहितीबाबत मार्गदर्शन
साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा, विशेषत: खोकला आणि शिंका येणे, आजारी व्यक्तीची काळजी घेण्यापूर्वी आणि नंतर आणि अन्न तयार करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी आपले हात धुवा, जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक पडतो तेव्हा आपले नाक आणि तोंड झाकून टाका आणि नंतर ते टिशू कचऱ्यामध्ये फेकून द्या, आपले डोळे, नाक किंवा तोंड न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा, आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क जसे की चुंबन, कप वाटणे किंवा खाण्याची भांडी सामायिक करणे टाळा, खेळणी आणि डोकरनॉब्स सारख्या वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागावर आणि वस्तूंना स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करा, विशेषतः जर कोणी आजारी असेल तर आपण आजारी असताना घरी रहा, आपल्याला वैद्यकीय काळजी घ्या, प्राण्यांच्या संपर्कानंतर आणि शेतात, बाजारे, कोठारे, पाळीव प्राणीसंग्रहालय आणि कृषी जत्यांना भेट दिल्यानंतर हात धुवा, आजारी असलेल्या प्राण्यांशी संपर्क टाळा.

अनेक मान्यवरांची उपस्थिती
तद्‍नंतर सेलरका यांनी जीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या विविध शिष्यवृत्या, फेलोशिप, अभ्यासक्रम यावरसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्राणिशात्र विभागप्रमुख डॉ. जी. बी. काळे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली तर डॉ आर. टी. परिहार, विज्ञान महाविद्यालय, मलकापूर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये व विभागातील प्रा. एस. एम. पिढेकर, प्रा. सचिन खंडारे, प्रा. स्वप्ना पाटील, प्रा. शुभांगी पाटील, प्रा. तृप्ती पारस्कर, प्रा. अनुपमा गायगोळ, प्रा. तेजल जवंजाळ, प्रा. फरहत नाझ, प्रसाद खानोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याकरिता पदवी व पद्युत्तर विभागाचे 59 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT