file photo
file photo 
विदर्भ

देहविक्रय व्यवसायासाठी तरुणीची उत्तर प्रदेशात विक्री

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची देहविक्रय व्यवसायासाठी उत्तर प्रदेशातील बनारस येथे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकाश दिलीप काळे (वय 26, रा. ब्राम्हणी), राजू पटेल (वय 34, रा. रामपूर, बनारस) अशी संशयितांची नावे आहेत. प्रकाश काळे यांनी एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून रामपूर येथे नेले व विनयभंग केला. रामपूर येथील राजू पटेल यास अवैध व्यवसायासाठी विक्री केली. शिवाय त्याने पीडितेची फसवणूक करून अत्याचार केला. ही घटना 1 फेब्रुवारी ते 21 एप्रिल 2019 या कालावधीत घडली. तरुणीने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. वणी येथील देहविक्रय व्यवसायात अशाच प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून मुलींची विक्री करण्यात आल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. गरजू मुलींना हेरून त्यांना विश्‍वासात घेतले जाते. देहविक्रय अड्ड्यावर नेऊन विक्री करण्यात येते. यात रॅकेटच सक्रिय असल्याची शंका उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT