sand mafiya attack on deputy tehsildar in gondia 
विदर्भ

गोंदियात नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला, शासकीय वाहनाच्या फोडल्या काचा

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी चौकशीसाठी गेलेल्या नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांनी हल्ला केला. ही घटना बोंडराणी येथे गुरुवारी (ता.12) घडली. माफियांनी शासकीय वाहनाच्या काचाही फोडल्या. 

जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैधरीत्या वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाळूमाफिया अवाजवी दरात वाळूविक्री करून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट करीत आहेत. त्यामुळे याला आळा घालता यावा, वाळूची चोरी थांबावी, यासाठी प्रशासनाने भरारी पथक स्थापन केले आहे. हे पथक वाळूवाघाटावर जाऊन चौकशी करीत आहेत. वाहनाच्या तपासणीअंती काही त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई करीत आहेत. मात्र, आता वाळूमाफियांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणे सुरू केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तिरोडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अप्पासाहेब तुकाराम वनकडे (वय 36) हे गुरुवारी वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथकासह बोंडराणी येथे गेले होते. यावेळी 10 ते 12 वाळूमाफियांनी पथकाच्या शासकीय वाहनाच्या (एमएच 35- ए. जे. 0709) मागे येऊन काचावर थापा मारल्या. तुम्ही येथे का थांबले आहात, येथे थांबायचे नाही, कोणत्याही वाहनाची रॉयल्टी तपासायची नाही, असा दम देत माफियांनी अरेरावी केली. त्यानंतर, एका वाळूमाफियाने वाहनाच्या समोरील काचावर काठी मारून काचा फोडल्या. एवढेच नव्हे, तर नायब तहसीलदार वनकडे यांच्यावर हल्ला केला. या घटनेची तक्रार नायब तहसीलदार वनकडे यांनी दवनीवाडा पोलिसांत केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार देवराम खंडाते करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT