file photo 
विदर्भ

गंभीर! तब्बल 23 विद्यार्थिनींचा विनयभंग, फरार प्राध्यापकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : येथील जिजामाता कला महाविद्यालयातील 23 विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला संशयित आरोपी प्रा. अतुल सारडे यास अखेर आज गुरुवारी (ता.9) अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल यांच्या पथकाने ही अटक केली.

23 विद्यार्थिनींनी विनयभंगाची तक्रार

येथील जिजामाता कला महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या अतुल सारडे याच्याविरुद्ध महाविद्यालयातील 23 विद्यार्थिनींनी विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यावर महाविद्यालयाने आपत्कालीन सल्लागार तथा चौकशी समितीचे गठण केले होते. या समितीच्या चौकशीत प्रा. अतुल सारडे दोषी आढळून आल्याने जिजामाता कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यासंदर्भात दारव्हा पोलिस ठाण्यात 14 डिसेंबर 2019 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती.

आरोपी अतुल सारडे फरार

त्यावरून पोलिसांनी प्रा. सारडे याच्याविरुद्ध भादंवि कलम 354, 354 अ, 354 डनुसार गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी अतुल सारडे फरार होता. दरम्यान, प्रा. अतुल सारडे यांनी दारव्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यावर दारव्हा न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. अखेर गुरुवारी दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी त्यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT