accident
accident sakal
विदर्भ

नागपूर : भीषण अपघातात कुटुंबातील चार ठार; तीन मुलींचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

कोंढाळी बाजारगाव: अमरावतीवरून नागपूरकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी बसस्थानकावर बसची वाट पाहत असलेल्या चार प्रवाशांना प्रशिक्षण घेत असलेल्या डॉक्टर कारचालकाची कार महामार्गावरील खड्डा चुकविताना अनियंत्रित झाली व दुभाजकावर धडकली, त्यानंतर उभ्या चार प्रवाशांना कारने चिरडत नेल्याची दुर्दैवी घटना घडली. चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. कारमधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

मृतांमध्ये गौतम जागो सालवंकर (वय५५, सातनवरी), शौर्य डोंगरे (वय९, मौदा नजिक इसापूर शिराली), सुबोध डोंगरे (वय ६, सातनवरी), चिनू विनोद सोनबरसे (वय१३, सातनवरी) यांचा समावेश आहे. ललिता बाबूलाल सोनबरसे (वय५०, सातनावरी) ही गंभीर जखमी असून ती नागपूर येथील दवाखान्यात उपचार घेत आहे.

प्राप्त माहितीवरून मारोती कार (क्र.एमएच२७, बीई४६१४) ही अमरावतीवरून नागपूरकडे येत असताना रविवारी दुपारी दोनच्या सातनवरी येथे पावसामुळे महामार्गावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालक डॉ.आशुतोष चंद्रकांत त्रिपाठी (वय२७, अमरावती) याची कार अनियंत्रित झाली व बसची प्रतीक्षा करीत असलेल्या चारही प्रवाशांना कारने चिरडत नेले. यात चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

कारमधील महिला ऐश्वर्या विनायक सारवे, श्रद्धा महेश सोनी ‘कार एयर बॅग’ तात्काळ उघडल्यामुळे तिघांनाही किरकोळ मार लागला. घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेऊन तात्काळ कोंढाळी पोलिसांना कळविले. मृत व जखमी यांना बाजारगाव येथील देशमुख प्रतिष्ठानच्या अॅबुल्नसने नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात आणले.

तिथे चौघांना मृत घोषित करण्यात आले. ठाणेदार चंद्रकांत काळे, सहायक निरीक्षक अजित कदम व पोलिस स्टॉपसह घटनास्थळी पोहचल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माखनिकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, नागेश जाधव आदी घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर कोंढाळी पोलिसांनी कारचालक डॉ.आतुशोष त्रिपाठीं व कारमधील सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत काळे करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्गवरील खड्डे ठरताहेत जिवघेणे

नागपूर-अमरावती महामार्गावरील पडलेल्या खड्ंड्यामुळे सातनवरी येथील सरपंच विजय चौधरी तसेच गावकऱ्यांनी गोंडखैरी येथील अटलांटा येथील व्यवस्थापकास वारंवार लेखी मागणी करून ही खड्डे बुजविले गेले नाहीत. परिणामी रविवारी खड्डा वाचविण्याच्या नादात अनियंत्रित झालेली कार मुख्य मार्ग सोडून दुभाजकावर आदळली. सर्व्हिस रोडच्या दुभाजकावर बसलेल्या पाच प्रवाशांना कारने चिरडले.

महामार्गावरील खड्डे बुजविले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सातनवरी येथील सरपंच विजय चौधरी, माजी सरपंच ताराचंद चालखोर, सांजाऊ भोंगे, अनिल काळभांडे, साहेबराव गोतमारे, रोशन रेवतकर, राहुल निगोट यांनी अटलांता कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली असून महामंडळानेसुद्धा सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या प्रवाशांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT