shegaon
shegaon 
विदर्भ

शेगाव : खून प्रकरणात संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध

सकाळवृत्तसेवा

शेगाव : शहरात रविवारी राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. २ तरुणांनी ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, खूनाच्या घटनेनंतर हे दोघेही संशयित तरुण फरार आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलिसांनी दोघा संशयितांचे छायाचित्र जारी केले आहे.

रविवारी सकाळी जानोरी रेल्वे गेट जवळील जुन्या रस्त्यावर राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (३०) या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. राजेशवर शुल्लक कारणावरुन एका भिकाऱ्याला ठार मारल्याचा आरोप होता. आणि नुकताच तो तुरुंगातून जामिनावर सुटून आला होता. राजेशची हत्या लाशा उर्फ राहूल समाधान रावंणचोरे (२२) आणि बुऱ्या सुरेश यादव (२३) या दोन तरुणांनी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ज्या दिवशी हत्या झाली त्याच्या एक दिवस आगोदर हे दोघेही संशयित तरुण मृतकासोबत असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हत्येच्या घटनेनंतर ते दोघेही फरार आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.  तपास ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT