The slab of the Samrudhi Highway bridge collapsed Amravati news 
विदर्भ

समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळला; रात्रंदिवस चालणाऱ्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह

सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : समृद्धी महामार्गाच्या निर्माणाधीन रस्त्यावरील बांधकामाच्या सिमेंटचा स्लॅब गुरुवारी (ता. सात) अचानकपणे कोसळल्याची घटना तालुक्‍यातील सावळा शिवारात घडली. या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती समृद्धी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तालुक्‍यातील सावळा शिवारात समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावरील सिमेंटच्या स्लॅबचे बांधकाम सहा व सात जानेवारीला सुरू होते. गुरुवारी (ता. सात) सकाळी साडेसातच्या दरम्यान सदरचे बांधकाम पूर्ण करून झाले. या बांधकामावर असलेले मजूर बाहेर पडताच अर्ध्या तासातच सकाळी सव्वाआठच्या सुमारास अचानक सिमेंट स्लॅबचे हे बांधकाम कोसळले.

घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून घेतला. यावेळी समृद्धी महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दत्तापूर पोलिसांना देण्यात आली. रात्रंदिवस चालणाऱ्या महामार्गाच्या या बांधकामाच्या दर्जावर मात्र प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच डिसेंबरला या समृद्धी महामार्गाची पाहणी करून एक मे महाराष्ट्र दिनाला हा रस्ता नागपूर ते शिर्डीपर्यंत सुरू केला जाणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. या शीघ्र संचार द्रूतगती मार्गाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या मजुरांच्या हातून रात्रंदिवस रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.

कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही
समृद्धी महामार्गाचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर पाहणी केली व पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी नसल्याची माहिती समृद्धी महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशी करून पुढील तपास सुरू आहे.
- ब्रह्मदेव शेळके,
ठाणेदार, दत्तापूर

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT