small child murder after unnatural act at Wardha 
विदर्भ

Video : वर्ध्यात घडली चिड आणणारी घटना; सैतान युवकाचे चिमुकल्याशी अनैसर्गिक कृत्य अन्‌...

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : इतवारा परिसरात एका विकृत युवकाने सात वर्षीय चिमुकल्याचा खून केला. ही घटना अनैसर्गिक कृत्यातून घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशाल गजानन जोगदंड (वय 26) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. यात जखमी झाल्याने त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकल्या मुलाशी घडलेल्या विकृत घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच संतापाचा चांगलाच भडका उडाला. आरोपीचा शोध घेत नागरिकांनी त्याच्या पाठलाग करून चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळ गाठत आरोपीला नागरिकांच्या तावडीतून सोडून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच परिसरातील नागरिकांनी थेट पोलिस ठाण्यावर धडक देत आमच्या स्वाधीन करा अशी मागणी करीत बराच वेळ घेराव घातला. यामुळे वातावरण चांगलेच चिघळले होते.

नागरिकांच्या संतप्त भावना आणि उद्रेक पाहता पोलिसांकडून रॅपीड ऍक्‍शन फोर्सच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर वातावरण शांत झाले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून या परिसरात भयाण शांतता होती. नागरिकांच्या संतप्त भावनांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो या शक्‍यतेने सकाळपासूनच घटनास्थळी आणि परिसरात पोलिसांचा कडा पाहरा होता. आरोपीवर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला अटक करण्याची कारवाई अद्याप करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

अशी घटली घटना

तारफैल परिसरात असलेल्या फुकटनगर येथे विशात जोगदंड बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास आहे. मात्र, काही दिवसांपासून तो या भागात नव्हता. काही दिवसांपूर्वी तो आला. परिसरातील सर्वांशी तो परिचित होता. याच परिचयातून त्याने घरासमोर खेळत असलेल्या चिमुकल्याला सोबत घेत आपले घर गाठले. रडण्याचा आवाज येत असल्याने घराच्या मागच्या बाजूस राहत असलेल्या काहींनी घराकडे धाव घेतली असता विशालने नागरिकांना परत पाठविले. परंतु, घराच्या मागील बाजूस राहणाऱ्या शेजाऱ्यास संशय आल्याने त्यांनी परिसरातील लोकांना ही गोष्ट सांगितली. यावेळी चिकुकल्याचे आई-वडील आणि परिसरातील नागरिक येत असल्याने कळताच विशालने घटनास्थळाहून पळ काढला. काही नागरिक त्याच्या मागे धावले आणि काहींनी चिमुकल्याचा शोध घेतला असता घरात असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. चिमुकल्याचा मृतदेह अर्धनग्न असल्याने अनैसर्गिक कृत्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आरोपी सेवाग्राम रुग्णालयात

संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला प्रारंभी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे प्रथमोपचार करून त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

आरोपीला फाशी द्या नाही तर आमच्या स्वाधीन करा

मृत चिमुकल्याच्या आईने आरोपीला थेट फाशी द्या तसे होत नसेल तर त्याला आमच्या स्वाधीन करा, असे म्हणत आपला उद्वेग व्यक्त केला. यावेळी परिसरातील नागरिक चिडून असल्याचे दिसून आले आहे. अशा आरोपींना ठेवून काय करता, नागरिकांच्या स्वाधीन करा, आम्ही न्याय करायला तयार असल्याने बोलत होते. 

पाण्याच्या टॅंकमध्ये आढळला मृतदेह 
शुक्रवारी सायंकाळी चिमुकल्याचा खून झाल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांकडून घटनास्थळ गाठून पाहणी केली असता काही नागरिक आरोपीला मारहाण करीत होते. त्याला नागरिकाच्या तावडीतून सोडवून रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर बेपत्ता मुलाची शोधाशोध केली असता पाण्याच्या टॅंकमध्ये मृतदेह आढळून आला. हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्याने ही घटना अनैसर्गिक कृत्यातून घडली असावी असा संशय आहे. आरोपीवर सध्या सेवाग्रामनरुग्णालयात उपचार सुरू आहे. 
- योगेश पारधी, 
ठाणेदार, वर्धा शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

Latest Marathi News Live Update : वर्सोवा बीचवर महिलेला जीवे धमकी; आरोपीकडून पिस्तूल-चॉपर जप्त

Vitamin C Serum: हिवाळ्यातील ड्राय स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'व्हिटॅमिन C' सीरम, जाणून घ्या सोपे आणि उत्तम उपाय

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT