children 
विदर्भ

रिमझिम पावसात खेळणे चिमुकलीच्या जिवावर बेतले

सायराबानो अहमद

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) ः रिमझिम पाऊस आला की अंगणात पडणाऱ्या पावसात खेळण्याचा मोह चिमुकल्यांना आवरत नाही. मात्र, असे पाण्यात खेळणे एका चिमुकलीच्या जिवावर बेतले. तालुक्‍यातील वाढोणा येथील दहा वर्षे वयाच्या चिमुकलीचा विद्युत प्रवाहाच्या धक्‍क्‍याने दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली.

चिकी उर्फ स्वामिनी अजय दिवे (वय ८) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. रिमझिम पावसात अंगणाच्या परिसरात ती खेळत होती. दरम्यान, विहिरीजवळ असलेल्या एका झाडाचे पान तोडण्याकरिता ती गेली असता विहिरीमध्ये असलेल्या मोटरमधील जिवंत विद्युत तारांमधून पाऊस आल्याने संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का तिला बसला. यात चिकी हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने विद्युत प्रवाह बंद करून तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. 

ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. वाढोणा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मुलीच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पावसादरम्यान काळजी घ्या 

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस आल्यास सर्वत्र जमीन ओली होते. विहीर किंवा शेतात असलेल्या विद्युत मोटार आदींमधील वायर तुटून त्याचा जमिनीशी स्पर्श होऊन विद्युत प्रवाह संचारण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेती किंवा परिसरात वावरताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे धामणगाव रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता उदय राठोड यांनी केले आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT