Smuggling of pet animals going on from madhya prasdesh to andhra pradesh  
विदर्भ

मध्य प्रदेशातून आंध्रात होतेय पशुधन तस्करी; कारवाईत पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप 

राजकुमार भितकर

यवतमाळ : राज्यात गोहत्येला बंदी घालण्यात आली आहे. गोवंशतस्कर मध्य प्रदेशातून कवडीमोल भावात पशुधनाची खरेदी करून आंध्र प्रदेश व तेलंगणात तस्करी करीत आहेत. रात्रीच्या सुमारास महामार्गावर धावणाऱ्या ठराविक वाहनांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यात मास्टरमाइंड म्होरके अडकत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातून आंध्र प्रदेशात होणाऱ्या पशुधनतस्करीचा पर्दाफाश वारंवार झाला आहे. मात्र, तस्करीला आळा घालण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. शेतकरी व पशुपालकांकडून कवडीमोल भावात पशुधन खरेदी केले जाते. एका वाहनात निर्दयपणे कोंबून पशुधनाची वाहतूक केली जाते. 

यात मध्य प्रदेश, नागपूर, कळंब, यवतमाळ, पांढरकवडा इत्यादी प्रमुख शहरांमधील तस्करांची साखळीच जुळली आहे. कारवाई टाळण्यासाठी खात्यातीलच काही कर्मचारी त्यांच्या गळाला लागलेले आहेत. त्या तस्करीतही कमालीची स्पर्धा वाढली आहे. स्पर्धक व्यावसायिकांवर कारवाईसाठी तस्करांकडूनच टीप दिली जाते. त्यानुसार कारवाई होत असल्याचे सांगितले जाते. 

बड्या मास्यांना तस्करीत मोकळीक मिळत असल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेशातून नागपूर, कळंब, यवतमाळ, पांढरकवडामार्गे आंध्र प्रदेश व तेलंगणात पशुधनाला वाहनात कोंबून नेले जाते. वणी, महागाव, झरी हा मार्गही तस्करीसाठी सुरक्षित मानला जातो. महामार्गावर पोलिस राहत असले तरी त्यांच्याकडून गांभीर्याने तपासणी होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आलिशान वाहनातून प्रवास

एका ट्रकमध्ये काही हजारांत खरेदी केलेल्या पशुधनाला कोंबले जाते. कत्तलीसाठी लाखो रुपयांत विक्री केली जाते. त्यात कोट्यवधींची उलाढाल होते. पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तस्कर आलिशान कारमधून प्रवास करतात. पुढे वाहन व मागे ट्रक धावतात. मोबाईलच्या माध्यमातून म्होरके व चालक एकमेकांच्या संपर्कात राहतात. एखादवेळी कारवाई झाल्यास केवळ चालकच त्यात अडकतात.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Retention Deadline: पाच दिवस शिल्लक राहिले, १० खेळाडू या संघातून त्या संघात गेले!हार्दिक पांड्याने केला फायद्याचा सौदा, तर रिषभ पंत...

वयाच्या 56 व्या वर्षी सैफ अली खान इतका फिट कसा? शर्टलेस होऊन सैफ अली खानने केले सूर्यनमस्कार; Video Viral

Kuno Cheetah: कुनोतील चित्ता चंबळ नदी ओलांडून राजस्थानात दाखल; रणथंभोर परिसरात वन विभागाची नजर

Latest Marathi News Live Update : कागदपत्रांच्या तपासणीसाठी थांबवल्यानंतर ड्रायव्हरने स्वतःच्याच टेम्पोला लावली आग

Kirloskar Company Kundal : कुंडलमधील किर्लोस्कर कंपनी अन् गावकऱ्यांचा रस्त्यावरून वाद; थेट माजी आमदारांनी केलं ५ तास ठिय्या आंदोलन, नेमक काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT